पाणलोट विकासातून गाव उभारणीचा आदर्श मॉडेल जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार

Spread the love

धाराशिव – टाटा सामाजिक विज्ञान संस्था (टीस) व नाबार्ड यांच्या सहकार्याने राबवलेल्या आदर्श वडगाव (लाख) पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्पाची जिल्हाधिकारी श्री किर्ती किरण पुजार यांनी १० मार्च रोजी प्रत्यक्ष पाहणी केली.

या प्रकल्पाअंतर्गत जलसंधारणासाठी सीसीटी,गल्ली प्लग,सिमेंट बंधारे, साठवण तलाव तसेच वृक्षलागवड यासारखी महत्त्वपूर्ण कामे पूर्ण करण्यात आली आहेत.

या पाहणीस तहसीलदार श्री.अरविंद बोळंगे,वरिष्ठ भूवैज्ञानिक श्री.सी.डी. चव्हाण,टीसचे कॅम्पस संचालक प्रो. बाळ राक्षसे,तसेच डॉ.संपत काळे, श्री.गणेश चादरे,श्री.देविदास कदम, शंकर ठाकरे,आनंद भालेराव,डॉ. दयानंद वाघमारे,मनोहर दावणे यांसह स्थानिक प्रशासनाचे अधिकारी, ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री.किर्ती किरण पुजार म्हणाले,धाराशिव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पाणी,शेती आणि पर्यटन ही त्रिसुत्री अत्यंत महत्त्वाची आहे.पाणलोट क्षेत्रातील योजनांमुळे गावाचा विकास अधिक प्रभावीपणे साधता येईल. शेतीपूरक व्यवसायांसाठी शेळीपालन,कुक्कुटपालन आणि दुग्धव्यवसाय यासारख्या उपक्रमांना चालना देणे गरजेचे आहे.या दृष्टीने शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.असे ते म्हणाले.

श्री.पुजार यांनी गावाच्या विकासासाठी टीस व कोहिजन फाउंडेशन यांनी केलेल्या कार्याचे विशेष कौतुक केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामसेवक श्री.सय्यद यांनी केले.आभार श्री.गणेश चादरे यांनी मानले.

  • Related Posts

    लातूरातील ‘त्या’ वृद्ध शेतकऱ्याला आमदार गायकवाड देणार बैलजोडी

    Spread the love

    Spread the loveशेतकरी दाम्पत्याच्या जीवनसंघर्षाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता बुलढाणा : लातूर जिल्ह्यातील हाडोळती (ता. अहमदपूर) येथील अंबादास गोविंद पवार या ७६ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याकडे शेतातील मशागतीसाठी बैलजोडी नसल्याने…

    नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – मान्सुनपुर्व पाऊस धाराशिव जिल्हयात सरासरीपेक्षा जास्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तुळजापुर तालुक्यातील काक्रंबा येथील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी शेती पिकाची…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *