
धाराशिव – दि. 06 मार्च 2025 – धाराशिव जिल्हा पत्रकार संघाच्या नव्या कार्यकारिणीची निवड नुकतीच पार पडली असून, अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार मा. देविदास पाठक तर सरचिटणीसपदी रवींद्र केसकर यांची निवड करण्यात आली आहे.
संघाच्या नवीन कार्यकारिणीची निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी एकमताने मा. पाठक यांना संघाच्या अध्यक्षपदी तर केसकर यांना सरचिटणीसपदी निवडण्यात आले.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांच्या हक्क आणि हितासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच, पत्रकारांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रशासन व शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असेही सांगितले. यावेळी संघाच्या पदाधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील अनेक पत्रकार उपस्थित होते. नव्या कार्यकारिणीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.