राज्यस्तरीय फॅशन शो मोठ्या दिमाखात संपन्न

Spread the love

धाराशिव – नालंदा कॉलेज ऑफ फॅशन डिझायनिंग धाराशिव ने धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे राज्यस्तरीय ड्रेस डिझाईनिंग स्पर्धेचे आयोजन केले होते. सदर स्पर्धेमध्ये राज्यभरातून 150 च्या वर स्पर्धकांनी सहभाग नोंदवला सदर स्पर्धेत प्रथम ,द्वितीय व तृतीय अशा आलेल्या स्पर्धकांना अनुक्रमे रोख दहा हजार, सात हजार, पाच हजार अशी रोख रक्कम व ट्रॉफी देण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन डॉक्टर स्मिता गवळी यांनी केले . प्रमुख उपस्थितीमध्ये शिक्षण विस्तारअधिकारी दैवशाला हाके ,डॉक्टर रेखा ढगे ,संस्था अध्यक्ष प्राध्यापक प्रदीप रोडे, दीपा रोडे हे होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. लोखंडे यांनी केले तर स्पर्धा यशस्वी होण्याकरिता प्राध्यापक योगेश जोगदंड ,प्रा.अश्विनी गंगावणे, प्रा. उमेश कांबळे ,प्रा. नम्रता वरठा ,प्रा. आम्रपाली कांबळे ,प्रा. कामडी, प्रा. दिव्या ,यांनी प्राचार्य गडीराव यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करून स्पर्धा यशस्वी केली.

सदर स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

  • Related Posts

    सोयाबीनवरील शंखी गोगलगाय, पैसा/वाणी किडीचा वाढता प्रादुर्भाव ; सामूहिक नियंत्रणासाठी कृषी विभागाचे आवाहन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – चालू खरीप हंगामात मान्सूनच्या आगमनानंतर जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनची पेरणी व उगवण पूर्ण झाली आहे.मात्र, सध्या जिल्ह्यातील काही भागांत शंखी गोगलगाय तसेच पैसा/वाणी (Millipede) किडीचा…

    ‘पावसाचा प्रत्येक थेंब पिकासाठी वापरा’ ; जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः बीबीएफ यंत्र चालवत केली सोयाबीन पेरणी,तूरही टोकण पद्धतीने लावली

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – बदलते हवामान,कधी अतिवृष्टी तर कधी पावसाचा खंड… अशा अनिश्चित परिस्थितीतही सोयाबीनचे उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी रुंद सरी-वरंबा (BBF) तंत्रज्ञान हा सर्वोत्तम पर्याय असल्याचा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *