तेरणा युथ फाऊंडेशनच्या विविध पदाधिकाऱ्यांची निवड ,जिल्ह्यात ‘गाव तिथे व्यायामशाळा’ उपक्रम राबवणार

Spread the love

धाराशिव – तेरणा युथ फाऊंडेशनच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील युवकांच्या अडचणी सोडविणे आणि आपल्या परिसराच्या विकासाला हातभार लावण्याचे काम सुरु आहे. गेल्या काही महिन्यातच युथ फाऊंडेशनला चांगलाच प्रतिसाद मिळाला असून येत्या काळात अनेक महत्त्वपूर्ण उप्रकम युथ फाऊंडेशनच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहेत.

तेरणा युथ फाउंडेशनसोबत जोडल्या गेलेल्या युवकांचं जाळं आता धाराशिव जिल्ह्यात निर्माण होत आहे. यापैकी काही जणांची अध्यक्ष मेघ राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून विविध पदावर निवड करण्यात आली आहे.

तेरणा युथ फाऊंडेशनच्या धाराशिव तालुका अध्यक्षपदी श्री. नितीन खंडागळे(ढोकी) मो. 9158863282, उपाध्यक्षपदी श्री. प्रवीण शेटे(कोंड) मो. 9271888818 आणि धाराशिव शहराध्यक्षपदी श्री. गणेश इंगळगी(धाराशिव) मो. 7745831111 यांची निवड करण्यात आली आहे.

तसेच तुळजापूर तालुका अध्यक्षपदी श्री. मेघराज बागल(सांगवी) मो. 9665696229, उपाध्यक्षपदी श्री. सयाजी शिंदे(मंगरूळ) मो. 8888371837 आणि तुळजापूर शहराध्यक्षपदी श्री. दिनेश पलंगे(तुळजापूर) मो. 9665350135 यांची निवड करण्यात आली आहे. नळदुर्ग शहराध्यक्षपदी श्री. अशीतोष नाईक मो. 9325068902 व श्री. मुदसिर शेख मो. 8482887922 यांची निवड करण्यात आली आहे.
https://youth.ternatrust.org/youth/index1.php या लिंक वर जाऊन आपण तेरणा युथ फाऊंडेशनचे सदस्य होऊ शकता.

गाव तिथे व्यायामशाळा

तेरणा युथ फाउंडेशनच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यात ‘गाव तिथे व्यायाम शाळा’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यासाठी इच्छुक असलेल्या गावातील तरुणांनी युथ फाऊंडेशनकडे आपली मागणी नोंदवायची आहे. याकरिता 9420465511 हा हेल्पलाइन नंबर देखील देण्यात आला आहे. तसेच अधिक माहितीसाठी श्री आसराम शिंदे मो. 9987680670 व अविराज खांडेकर मो. 7666581451 यांना संपर्क करून शकता. जास्तीत जास्त गावांमध्ये हा उपक्रम राबवून तेथील तरुणांना शारीरिक स्वास्थ्याच्या दृष्टीने सजग करण्यासाठी ही मोहीम हाती घेतल्याचे तेरणा युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष मेघ राणाजगजीतसिंह पाटील यांनी सांगितले.

  • Related Posts

    धाराशिव: तुळजाभवानी स्टेडियमवर खासगी अकॅडमींची गर्दी, सर्वसामान्यांच्या व्यायामात अडथळा

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – शहरातील नागरिकांसाठी व्यायामाचे एकमेव ठिकाण असलेल्या तुळजाभवानी स्टेडियमवर खासगी क्रीडा अकॅडमींनी मोठ्या प्रमाणावर जागा व्यापल्याने सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे. सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत व्यायामासाठी येणाऱ्या…

    अ‍ॅथलेटिक्समध्ये महाराष्ट्राला 3 सुवर्ण, रिक्षा डायव्हरच्या मुलाची सुवर्ण कामगिरीचैतन्य, साहिल, सिध्दीची सुवर्णमय कामगिरी, मीनाक्षीला रौप्य

    Spread the love

    Spread the loveनवी दिल्ली : अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्राच्या पॅरा खेळाडूंनी 3 सुवर्णांसह 1 रौप्य पदके जिंकून खेलो इंडिया पॅरा स्पर्धेतील अ‍ॅथलेटिक्सचे मैदान गाजवले. 100 मीटर शर्यतीत अकोलाच्या चैतन्य पाठकसह गोळाफेकीत कराडच्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *