
रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याने त्याच्या फोनच्या कॉल लॉगचा फोटो X (twitter) वर शेअर केला आहे. त्याने लिहिले, “जर मला २५ वर्षांपूर्वी कोणी सांगितले असते… माझ्या करिअरच्या शेवटच्या दिवसाचा कॉल लॉग असा असणार आहे, तर मला त्याच वेळी हृदयविकाराचा झटका आला असता.” सचिन तेंडुलकर आणि कपिल देव यांचे आभार मानत त्याने लिहिले, “ मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो.”