नगरविकास विभागाच्या जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा सुरूजिल्ह्यातील नगरपालिकांतील अधिकारी, कर्मचार्‍यांचा सहभाग

Spread the love

धाराशिव – महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभाग आणि नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नगरपरिषद प्रशासनाच्यावतीने जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी धाराशिव जिल्ह्याचे सर्व नगरपरिषदांचे मुख्याधिकारी, संवर्ग अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
धाराशिव शहरातील तुळजाभवानी क्रीडा मैदानावर गुरूवार, 2 ते 4 जानेवारी दरम्यान जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी सचिन ओम्बासे यांच्या उपस्थितीत गुरूवारी पार पडले. यावेळी नगरपरिषद प्रशासन विभागाचे जिल्हा सहआयुक्त अजितकुमार डोके, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे, धाराशिवचे मुख्याधिकारी वसुधा फड, उमरगा नगरपरिषद व लोहारा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर, परंडा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली, भूम नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी शैला डाके, वाशी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी कांबळे, तुळजापूर आणि नळदुर्गचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार, मुरूम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सचिन भूजबळ उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्पर्धेस प्रारंभ करण्यात आला. या तीन दिवसीय स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी हे क्रिकेट, व्हॉलीबॉल, कॅरम, बुध्दीबळ, बॅडमिंटन, टेबल टेनिस, नृत्य, गायन, नाटक, रांगोळी यांसह विविध स्पर्धांमध्ये भाग घेणार आहेत. या स्पर्धेतील विजेते विभागीय स्पर्धेसाठी निवडले जाणार आहेत. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी नगरविकास विभागातील कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

  • Related Posts

    मिशन लक्ष्यवेध अंतर्गत लातूर विभागात ॲथलेटिक्स व कुस्तीचे निवासी क्रीडा निपुणता केंद्र२० मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – राज्यातील क्रीडा क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन लक्ष्यवेध’ या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत लातूर विभागासाठी अॅथलेटिक्स आणि कुस्ती या दोन खेळांचे निवासी विभागीय क्रीडा निपुणता…

    राज्य क्रीडा दिनानिमित्त,आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – : १५ जानेवारी हा दिवस ऑलिंपिकवीर दिवंगत खाशाबा जाधव यांचा जन्मदिन म्हणून राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. दिवंगत ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *