
धाराशिव – जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, एकविध क्रीडा संघटनेच्या सहकार्याने जिल्हयात विविध ठिकाणी १२ ते १८ डिसेंबर दरम्यान क्रीडा सप्ताहनिमित्त विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.या क्रीडा स्पर्धेत प्राविण्य संपादन केलेल्या खेळाडूंचा प्रमाणपत्र देऊन सत्कार गौरव करण्यात आला.
या क्रीडा सप्ताहात स्केटींग,कराटे, कुस्ती,मैदानी,लॉन टेनिस,आर्चरी, बुध्दीबळ,कबड्डी,आट्या- पाट्या, तायक्वांदो,सायकलिंग,रग्बी, वेटलिफ्टिंग,स्केटिंग,ज्युदो, लाठी-काठी,लेझीम इत्यादी क्रीडा प्रकारात जिल्हयातून ६५० खेळाडूंनी सहभाग नोंदविला.
श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम, धारािशव येथील स्केटींग मैदानावर १८ डिसेंबर रोजी क्रीडा सप्ताहाचा समारोप करण्यात आला.विविध क्रीडा स्पर्धेत प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांक संपादन केलेल्या खेळाडूंना जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ,जिल्हा नियोजन अधिकारी अर्जुन झाडे, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे,संशोधन अधिकारी रविकांत काळे,बालाजी लोमटे,क्रीडा संघटनेचे प्रविण गडदे,योगेश थोरबोले,जावेद शेख,मनोज पंतगे, राम दराडे यांचे हस्ते प्रमाणपत्र देवुन खेळाडूंना सन्मानित करण्यात आले.क्रीडा अधिकारी भैरवनाथ नाईकवाडी, कैलास लटके,अक्षय बिरादार,क्रीडा मार्गदर्शक डॉ.शुंभागी रोकडे,डिंपल ठाकरे आदींची अधिकारी उपस्थित होती.