
पुणे -: पर्वती येथील सैनिकी मुलांचे वसतिगृहात तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने अतिरिक्त सहायक वसतिगृह अधीक्षक पदाकरीता इच्छुक माजी सैनिकांना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय येथे १४ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
अतिरिक्त सहायक वसतिगृह अधीक्षक पदाकरीता २ जागा रिक्त आहेत. उमेदवारांना २४,८७५ हजार रुपये दरमहा मानधन अदा करण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी ०२०-२६१२२२८७ या क्रमांकावर किंवा ईमेल zswo_pune@maharashtra.gov.in ईमेल पत्त्यावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल हंगे स.दै. (नि) यांनी केले आहे.