वाशी येथे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी अर्ज मागविले

Spread the love

धाराशिव – एकात्मिक बालविकास सेवा योजना, ग्राम प्रकल्प वाशी अंतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.अर्ज स्वीकृतीची मुदत ४ मार्च २०२५ असून,प्रकल्प कार्यालयात कार्यालयीन वेळेत अर्ज स्वीकारले जातील.संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रातील इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा.अधिक माहितीसाठी प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधावा.

या भरतीमध्ये ४ अंगणवाडी सेविका आणि २५ अंगणवाडी मदतनीस यांची भरती करण्यात येणार आहे. यामध्ये पारगाव (पाथरड वस्ती), पारगाव (आनंद नगर),जानकापूर (पवार वस्ती),पिंपळगाव क (पारधी वस्ती), तांदुळवाडी (साखर कारखाना),मांडवा (पारधी वस्ती), इंदापूर (साखर कारखाना), सोनारवाडी (नांदूरकी वस्ती), सरमकुंडी (फाटा) फक्राबाद (मुरकुटे बिक्कड वस्ती),पिंपळगाव लिंगी (झोपडपट्टी वस्ती),पिंपळगाव (को), पिंपळगाव (को) तांबडे वस्ती तेरखेडा पारधी वस्ती नं.०१,तेरखेडा,घोडकी, घाटपिंपरी,म्हसोबाचीवाडी, दसमेगाव (पारधी वस्ती) याठिकाणी अंगणवाडी मदतनीस यांची प्रत्येकी १ पदासाठी तर गोजवडा (३ पदे अंगणवाडी मदतनीस),पारा (३ पदे अंगणवाडी मदतनीस) भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

दसमेगाव,गोलेगाव,शेलगाव,पांगरी येथे पदे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे प्रत्येकी १ पद भरण्यात येणार आहेत.

  • Related Posts

    धाराशिव येथे २२ मे रोजी भव्य रोजगार मेळावा ; १७ नामांकित आस्थापनांकडून २८९ पदांसाठी भरती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,धाराशिव आणि रामकृष्ण परमहंस महाविद्यालय,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने युवक व महिला उमेदवारांसाठी शुक्रवार दि.२२ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता…

    अधिकारमित्र’ पदासाठी अर्जास १७ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

    Spread the love

    Spread the loveनिस्वार्थ समाजसेवेची इच्छुकांसाठी सुवर्णसंधी — जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धाराशिव – उस्मानाबाद जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्ह्यातील सर्व तालुका विधी सेवा समित्यांमार्फत ‘अधिकारमित्र’ पदाकरिता काम करण्यास इच्छुक…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *