एनसीटीई मान्यताप्राप्त अध्यापक विद्यालय व महाविद्यालय संघटना नवी दिल्लीच्या महाराष्ट्र सरचिटणीसपदी प्रा.सतिश मातने यांची नियुक्ती

Spread the love

एनसीटीई मान्यताप्राप्त अध्यापक विद्यालय व महाविद्यालय संघटना नवी दिल्लीच्या महाराष्ट्र सरचिटणीसपदी प्रा.सतिश मातने यांची नियुक्ती

धाराशिव (प्रतिनिधी) – कळंब येथील भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतिश मातने यांची एनसीटीई मान्यता प्राप्त अध्यापक विद्यालय व महाविद्यालय संघटना नवी दिल्लीच्या महाराष्ट्र सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.एस.व्ही.आर्या यांनी त्यांना दिले आहे.

एनसीटीई मान्यताप्राप्त अध्यापक विद्यालय व महाविद्यालय संघटना अखिल भारतीय पातळीवर कार्यरत असून एनसीटीईने मान्यता दिलेल्या बी.एड.,बी.पी.एड.एम.एड.,डी.एड. या शिक्षक प्रशिक्षण संस्थांच्या संदर्भात एनसीटीई व मान्यता प्राप्त अध्यापक विद्यालय महाविद्यालय यांच्यात समन्वय साधण्याचे काम या संस्थेच्या माध्यमातून केले जाते. राज्यातील जवळपास साडेचारशेच्या आसपास अध्यापक विद्यालये व दीडशे पेक्षा जास्त अध्यापक महाविद्यालय यांची प्रवेश प्रक्रिया, इतर सर्व एनसीटीईशी संबंधित बाबी या करिता ही संघटना काम करते.देशातील सर्व राज्यातील संघटना कार्यरत असून जवळपास 20 हजारापेक्षा जास्त अध्यापक विद्यालये व महाविद्यालये या संघटनेशी संलग्न आहेत.

एनसीटीई मान्यताप्राप्त अध्यापक विद्यालय व महाविद्यालय संघटना नवी दिल्लीच्या महाराष्ट्र सरचिटणीसपदी शिक्षण व पत्रकारिता क्षेत्रात
१७ वर्षापासूनकार्यरत असलेले भैरवनाथ अध्यापक विद्यालय कळंब येथे प्राचार्य म्हणून कार्यरत असलेले प्रा.सतिश मातने यांची नियुक्ती झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल एनसीटीई मान्यताप्राप्त अध्यापक विद्यालय व महाविद्यालय संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.एस व्ही.आर्या, राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील, महाराष्ट्राचे अध्यक्ष सुदर्शन कदम यांच्यासह अध्यापक विद्यालयातील प्राचार्य व कर्मचारी यांच्याकडून अभिनंदन होत आहे.

  • Related Posts

    पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी.

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – 10 जुलै 2025 रोजी सकाळी ठीक 08 वा. 30 मि. गुरुपौर्णिमे च्या निमित्ताने पोदार इंटरनॅशनल स्कूल, धाराशिव येथे गुरुचे महत्व अधोरेखित करणारे सादरीकरण विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या…

    आषाढी एकादशी निमित्त जिल्हा परिषद प्रशाला शाळा, वाघोली येथे पारंपरिक वारकरी दिंडी उत्साहात साजरी

    Spread the love

    Spread the loveवाघोली – आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने जिल्हा परिषद प्रशाला शाळा, वाघोली येथे भक्तिभावाने पारंपरिक वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रखुमाईच्या वेशभूषेत टाळ, मृदंग व अभंगगायनाच्या गजरात उत्साहाने…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *