न. प. शाळा क्र.११ शाळेचे क्रीडा व सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश

Spread the love

धाराशिव  (प्रतिनिधी) – येथील‌ समता नगरातील नगर परिषद प्राथमिक शाळा क्रमांक ११ या शाळेतील विद्यार्थ्यांनी व क्रीडा स्पर्धेमध्ये घवघवीत यश मिळवले आहे.

धाराशिव शहरातील नगर परिषद शाळा क्रमांक ११ मधील विद्यार्थिनी खोखो स्पर्धेत मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक तर मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकाविला. तसेच थ्रो बॉल स्पर्धेत मुलींच्या संघाने द्वितीय व क्रिकेटमध्ये मुलांच्या संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. वैयक्तिक क्रीडा प्रकारात आलिया फारुख मुजावर हिने १०० मीटर धावण्याच्या प्रथम तर मोठ्या गटात ऐश्वर्या राम घोडके या विद्यार्थिनीने द्वितीय क्रमांक तसेच २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत तस्मिया फारूक मुजावर हिने प्रथम क्रमांक मिळविला आहे.
या यशाबद्दल नगर परिषद शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी तथा उपमुख्याधिकारी पृथ्वीराज पवार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. यासाठी शाळेचे मुख्याध्यापक ए ए लावंड, मार्गदर्शक शिक्षक बी.यु. शेंडगे, डी एम खारे, जे पी अडसुळ, के के पवार, ए डी जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. यासाठी शिक्षक यु ई जोगदंड यांचे सहकार्य मिळाले.

  • Related Posts

    कल्याणसागरचा माजी विद्यार्थी उत्कर्षचे नीट व जेईई परीक्षेत उत्तुंग दुहेरी यश!‘नीटचे 656 गुण तर जेईई मध्ये 99.40 पर्सेंटाईल’

    Spread the love

    Spread the loveपरंडा:- कल्याणसागर समुहातील परंडा येथील सरस्वती प्राथमिक शाळा व कल्याणसागर माध्यमिक विद्यालयाचा माजी विद्यार्थी उत्कर्ष गजानन कोठावळे याने नीट (NEET) आणि जेईई (JEE) या राष्ट्रीय पातळीवरील दोन्ही अत्यंत…

    उस्मानाबाद जिल्हा खाजगी शिक्षण संस्था चालक संघटनेची बैठक संपन्न

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – : उस्मानाबाद जिल्हा खाजगी शिक्षण संस्था चालक संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी (दि. २ जून २०२६) दुपारी १२.३० वाजता के. टी. पाटील डी. फार्मसी कॉलेज येथे उत्साहपूर्ण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *