MKCL व SIIT कॉम्पुटर सेंटर च्या वतीने विद्यार्थ्यांमार्फत सारथी कडून मराठा समाजासाठी मिळणाऱ्या विविध मोफत योजनांची माहिती सांगितली.

Spread the love

धाराशिव – 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त
धाराशिव जिल्ह्यातील आंबेवाडी, मेड्सिंगा, चिखली, राजुरी, आरनी, महळुंगि, खानापुर, बोरगांव झाडी, गोवर्धन वाडी, उंबरे कोठा धाराशिव विवध ग्रामपंचायत येथे MKCL व SIIT कॉम्पुटर सेंटर च्या वतीने विद्यार्थ्यांमार्फत सारथी कडून मराठा समाजासाठी मिळणाऱ्या विविध मोफत योजनांची माहिती ग्रामस्थांना मार्गदर्शनपर करून देण्यात आली.
ग्रामसभेत एस आयटी कॉम्प्युटर इन्स्टिटयूटचे सारथी कोर्स चे लाभार्थी विद्यार्थी भैरवनाथ दरेकर सर, अर्जून बारांगुळे, आकाश बागल, अनिकेत गायकवाड, अभिजित काळे, प्रशांत मते सर, सत्यम लोमटे, पायल सूर्यवंशी मॅडम, शिवानी भद्रे, वैष्णवी भोसले या सर्वांनी मराठा समाजासाठी मोफत असलेला 6 महिन्यांचा CSMS -DEEP कॉम्प्युटर कोर्स संदर्भात माहिती दिली. सारथी संस्थेमार्फत एमपीएससी यूपीएससी करत असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण व कौशल्य विकास उपक्रम अशा विविध उपक्रमांची माहिती दिली तसेच विविध कॉम्प्युटर कोर्स, वाढते सायबर गुन्हे याला बरेच लोक बळी पडतात याला रोखण्यासाठी काय उपाययोजना करावी यासह विविध माहिती दिली जाते. याप्रसंगी गावातील संबंध नागरिक ग्रामस्थ सरपंच उपस्थित होते. या उपक्रमासाठी SIIT COMPUTER सेंटर चे टीम आकाश मोरे, ऋतुराज घेवारे, अविनाश वाघमारे, शशिकांत वाघमारे यांच्याकडून आयोजन व MKCL जिल्हा समन्वयक श्री. धनंजय जेवळीकर सर यंच्याकडून मार्गदर्शन मिळाले.

  • Related Posts

    कल्याणसागरचा माजी विद्यार्थी उत्कर्षचे नीट व जेईई परीक्षेत उत्तुंग दुहेरी यश!‘नीटचे 656 गुण तर जेईई मध्ये 99.40 पर्सेंटाईल’

    Spread the love

    Spread the loveपरंडा:- कल्याणसागर समुहातील परंडा येथील सरस्वती प्राथमिक शाळा व कल्याणसागर माध्यमिक विद्यालयाचा माजी विद्यार्थी उत्कर्ष गजानन कोठावळे याने नीट (NEET) आणि जेईई (JEE) या राष्ट्रीय पातळीवरील दोन्ही अत्यंत…

    सोयाबीनवरील शंखी गोगलगाय, पैसा/वाणी किडीचा वाढता प्रादुर्भाव ; सामूहिक नियंत्रणासाठी कृषी विभागाचे आवाहन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – चालू खरीप हंगामात मान्सूनच्या आगमनानंतर जिल्ह्यातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनची पेरणी व उगवण पूर्ण झाली आहे.मात्र, सध्या जिल्ह्यातील काही भागांत शंखी गोगलगाय तसेच पैसा/वाणी (Millipede) किडीचा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *