धाराशिवमधील मच्छीमारांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

Spread the love

धाराशिव – लक्ष्मणराव इनामदार नॅशनल अकॅडमी फोरको-ऑपरेटिव्ह रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रशिक्षण केंद्र, एन.सी.डी.सी.पुणे,सहकार मंत्रालय, भारत सरकार आणि मत्स्यव्यवसाय विभाग,महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने धाराशिव जिल्हयातील मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांचे पदाधिकारी व मच्छीमारांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा नुकतीच आयोजित करण्यात आली.

राष्ट्रीय सहकारी विकास निगम,पुणेचे उपसंचालक गणेश गायकवाड, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी अजिंक्य देवकते, सहाय्यक निबंधक (प्रशासन) डॉ.एम.आर.अंबिलपुरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

श्री.गायकवाड यांनी कार्यशाळेस उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत करुन प्रास्ताविक केले. यामध्ये राष्ट्रीय सहकार विकास निगम,पुणे यांच्यामार्फत मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था,मत्स्य उत्पादक शेतकरी सहकारी संस्था यांचेसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती प्रास्ताविकातून दिली.

सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय जे.एस.पटेल यांनी शास्त्रोक्त पध्दतीने मत्स्य बोटुकली संचयन, मत्स्यउत्पादन यांचे महत्व सांगताना जलसंपत्ती व मत्स्यपालनाचे महत्व अधोरेखित केले.गुणवत्तापूर्ण बीजनिर्मिती,बीजसंकलन त्याची उपलब्धता हा मत्स्यव्यवसायातील यशाचा गाभा आहे.मच्छीमार बांधवांनी कोलडस्टोरेज,मत्स्य विपणन,माशांची बाजारपेठेतील उपलब्धता या बाबीकडे लक्ष देणे आवश्यक आहे असे सांगितले.मत्स्य व्यवसायात महिलांचे प्रमाण अत्यल्प असून महिलांनी एकत्र येऊन मत्स्य सोसायट्या स्थापन करायला हव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

तसेच राष्ट्रीय सहकार विकास निगम, पुणे यांच्यामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मच्छिमार सहकारी संस्था आणि मत्स्योत्पादक शेतकरी सहकारी संस्था यांनी घेवून संस्थेच्या हिताबरोबरच स्वतःची आर्थिक प्रगती करावी असे ते म्हणाले.

सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी श्री.देवकते यांनी मत्स्यव्यवसाय विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या जिल्हास्तरीय योजना,प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना,ई-श्रम कार्ड,प्रधानमंत्री अपघात गट विमा योजना,एन.एफ. डी.पी नोंदणी आदी विविध योजनांची सविस्तर माहिती देवून मच्छिमारांना योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले.

रामकृष्ण परमहंस महाविद्यालय प्राचार्य डॉ.जे.एस. देशमुख यांनी सहकारातून उन्नती साध्य करण्याचे आवाहन उपस्थित मच्छिमारांना करुन भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.सहाय्यक निबंधक (प्रशासन) डॉ.एम.आर.अंबिलपुरे यांनी सहकारी संस्थांच्या स्थापनेचा उद्देश,व्यवस्थापन याबाबत सहकार विभागाच्या मार्गदर्शक सुचनाबाबत सविस्तर विवेचन केले.

मत्स्य शेतकरी उत्पादक संस्था व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था यांच्यासाठी असलेल्या विविध कल्याणकारी योजनांसाठी प्रस्ताव कसे तयार करायचे,यासंदर्भात महाराष्ट्र राज्य मच्छिमार सहकारी संघ मर्यादीत मुंबईचे तांत्रीक सल्लागार रोहित मांदळे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.अमोल भड़के यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले या एक दिवसीय कार्यशाळेला मच्छीमार सहकारी संस्था,मत्स्य उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Related Posts

    लातूरातील ‘त्या’ वृद्ध शेतकऱ्याला आमदार गायकवाड देणार बैलजोडी

    Spread the love

    Spread the loveशेतकरी दाम्पत्याच्या जीवनसंघर्षाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता बुलढाणा : लातूर जिल्ह्यातील हाडोळती (ता. अहमदपूर) येथील अंबादास गोविंद पवार या ७६ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याकडे शेतातील मशागतीसाठी बैलजोडी नसल्याने…

    नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – मान्सुनपुर्व पाऊस धाराशिव जिल्हयात सरासरीपेक्षा जास्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तुळजापुर तालुक्यातील काक्रंबा येथील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी शेती पिकाची…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *