अँग्रीस्टॅक योजना : शेतकऱ्यांनी १५ फेब्रुवारीपर्यंत नोंदनी करावी जिल्हाधिकारी यांचे आवाहन

Spread the love

धाराशिव – केंद्र शासनाचा अॅग्रीस्टैंक हा एक महत्वाकांक्षी डिजिटल उपक्रम आहे.यामध्ये शेतकरी माहिती संच तयार केला जात आहे.प्रत्येक शेतकऱ्याला एक विशिष्ट असा शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) देण्यात येत आहे.या विशिष्ट ओळख क्रमांकाच्या आधारे भविष्यात कृषीविषयक सर्व व्यवहार व योजना पार पडणार आहेत.

यासाठी सदर ओळख क्रमांक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या शासनमान्य पोर्टलवर नोंदणी करावी.असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओग्बासे यांनी केले आहे.

या पोर्टलवर नोंदणीसाठी अॅग्रीस्टॅक या अँपवर जाऊन शेतकरी स्वतः सेल्फ मोडमधून नोंदणी करू शकतात.तसेच सीएससी केंद्रात जाऊन नोंदणी करता येते.यासाठी गावनिहाय शिबिरे घेण्याच्या सूचना ग्राम महसूल अधिकारी तथा तलाठी व कृषी सहाय्यक यांना देण्यात आल्या आहे.ही नोंदणी १५ फेब्रुवारी २०२५ अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे

पिक विमा अनुदान हे फार्मर आयडी मार्फत देण्यात येणार आहे.तसेच पीएम किसानचे हप्तेसुद्धा याच माध्यमातून देण्याचे नियोजित आहे.

सीएससी केंद्रामार्फत शेतकरी नोंदणी करण्यासाठी खालील युट्यूब लिंकवर सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. https://youtu.be/lpsEf555g4w?si=zaNjl4VexeWopWD3
यासाठी शेतकऱ्यांनी संबंधित गावच्या ग्राम महसूल अधिकारी तथा तलाठी व कृषी सहाय्यक अथवा सीएससी केंद्र चालकाकडे संपर्क साधावा.असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

  • Related Posts

    कृषीविषयक योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा ; एआयच्या माध्यमातून लाभार्थी वाढवा पालकमंत्री प्रताप सरनाईक

    Spread the love

    Spread the loveधाराशिव कृषी विस्तार ॲपचे उद्घाटन खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत कृषी नियोजन,दुष्काळ तयारी, बी-बियाणे,खतसाठा आणि वृक्षलागवडीवर भर धाराशिव – केंद्र व राज्य शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत…

    तुळजापूर येथे ‘श्री तुळजाभवानी कृषी महोत्सव २०२६’चा दिमाखदार शुभारंभ

    Spread the love

    Spread the loveआधुनिक तंत्रज्ञान,तज्ज्ञ मार्गदर्शन व ७५ स्टॉल्सच्या माध्यमातून बळीराजाला नवे बळ धाराशिव – महाराष्ट्र शासन कृषी विभाग,आत्मा विभाग आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘श्री तुळजाभवानी…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *