
नळदुर्ग: हैदराबाद-मुंबई महामार्गावरील नळदुर्ग येथील “आपलं घर शाळा” कॉर्नरजवळ आज दुपारी 3.20 वाजता मोटरसायकल चालकाचा अपघात झाला. जळकोटहून नळदुर्गकडे जाणाऱ्या मोटरसायकल (क्रमांक MH-25-AZ-5147) वरील चालक दिलीप शंकरशेट्टी (वय 40, रा. नळदुर्ग, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) यांची मोटरसायकल अचानक स्लिप झाल्याने ते गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान, नाणीज धामची मोफत रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. जखमी दिलीप शंकरशेट्टी यांना तत्काळ उपजिल्हा रुग्णालय, नळदुर्ग येथे दाखल करण्यात आले.
सदरील संस्थानची रुग्णवाहिका अपघातग्रस्तांसाठी नेहमी तत्पर राहते, अशी माहिती स्थानिकांनी दिली.