
धाराशिव – जामखेडहून सोलापूरकडे कांदा घेऊन जाणारी 407 टेम्पो (वाहन क्रमांक MH17 AG 4914) संध्याकाळी दहाच्या सुमारास गाझी ढाबा, धाराशिव समोर पलटी झाल्याची दुर्दैवी घटना घडली. अपघातात वाहनाचे मोठे नुकसान झाले असून चालक आणि क्लिनर यांना केवळ किरकोळ मार बसला आहे,तर सुदैवाने कोणालाही मोठी दुखापत झालेली नाही.
प्राथमिक माहितीनुसार, सदर टेम्पो कांद्याने पूर्ण भरलेली होती. जामखेडवरून सोलापूरच्या दिशेने जात असताना अचानक मागील बाजूचे टायर फुटल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी रस्त्याच्या बाजूला पलटी झाली, अपघात इतका भीषण असून ही सुदैवाने गडीमधील दोघांना केवळ खरचटले आहे,
गाडीमध्ये चालक विजय गायकवाड व त्यांच्यासोबत किनर संजय कोळी (रा. पिंपळगाव, ता. जामखेड) हे प्रवास करत होते. अपघातानंतर स्थानिक नागरिक व आय आर बी चे पेट्रोलिंग करत असलेले कर्मचारी यांनी तात्काळ मदतीला धाव घेतली आणि चालक व क्लिनर यांची मदत केली,
या घटनेमुळे काही वेळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. मात्र आय आर बी चे पेट्रोलिंग करत असलेले वाहन व कर्मचारी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली असून, अपघात झालेल्या वाहनाचे पर्यायी व्यवस्था करण्यात येत आहे.
हा अपघात कांद्याच्या अति वजन व वाहतुकीदरम्यान केलेल्या असुरक्षित बांधणीमुळे घडल्याचे बोलले जात आहे. यावरून मालवाहतुकीतील सुरक्षेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ताज्या बातम्यांसाठी आमचा ब्लॉग फॉलो करा आणि शेअर करायला विसरू नका.