आश्रम शाळा शिंगोली येथे जिल्हास्तरीय आश्रम शाळा क्रीडा स्पर्धा संपन्न

Spread the love

धाराशिव : शिंगोली आश्रमशाळेत दि. १२.१.२०२५ रोजी तिसया दिवशी जिल्हास्तरीय क्रिडा महोत्सव२०२४-२५ ची सांगता, युवराजजी भोसले, निरीक्षक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, धाराशिव, मा. आण्णासाहेब चव्हाण ,मुख्याध्यापक विद्यानिकेतन माध्यमिक आश्रमशाळा व मा. खंडू रंगनाथ पडवळ, आदर्श विमुक्त जाती प्राथमिक आश्रम शाळा, शिंगोली, प्राचार्य दयानंदजी राठोड, बावी आश्रमशाळा, मा. डिगंबर बंडगर, अध्यक्ष, आश्रमशाळा उमरेगव्हाण, संतोषजी चव्हाण , सचीव आश्रमशाळा , जळकोट, क्रिडाशिक्षक सोलंकर सर, पुजारी सर, बी. आर. जाधव सर घांटग्री आश्रमशाळा, सुधीर कांबळे सर , शिंगोली आश्रमशाळा, नागनाय पाटील, रत्नाकर पाटील, चंद्रकांत जाधव, सुर्यकांत बडदापुरे, दिपक खबोले, प्रशांत राठोड, मल्लिनाथ कोणदे, कैलास शानिमे, विशाल राठोड, सचीन राठोड व मॅडम सुरेखा कांबळे, श्रद्धा सुर्यवंशी, ज्योती साने, ज्योती राठोड,बालिका बोयने, इत्यादी शिंगोली आश्रमशाळा शिक्षक व दिपली गरड ,( येवती आश्रमशाळा) कर्मचारी गोविंद बनसोडे, रेवा चव्हाण, लिंगा आडे, अविनाश घोडके, अमोल जगताप, सागर सुर्यवंशी, सतीश कुंभार इत्यादी कर्मचाऱ्यांनी सामने यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. धाराशिव जिल्हयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी१०० मीटर धावण्यात प्रथम क्रमांक शेख इरफान अब्बासअली, शिंगोली आश्रमशाळा येथील शिक्षकांनी हा बहुमान पटकावला. वयोगट १४ वर्ष लांबउडी मुलात प्रथम क्रमांक कृष्णा संतोष चव्हाण, श्री. कुलस्वामीनी आश्रमशाळा जळकोट, दुसरा क्रमांक मंगेश शाहूराज गायकवाड , सरस्वती प्राथमिक आश्रम शाळा, होळी, १७ वर्ष मुले लांब उडी प्रथम क्रमांक पवार विकास प्रकाश, श्री कुलस्वामीनी आश्रमशाळा जळकोट, १९ वर्ष मुली प्रथम क्रमांक पवार सपना भीमराव , श्री कुलस्वामीनी आश्रमशाळा जळकोट, राठोड प्रतिक्षा अकुंश, घाटंग्री आश्रमशाळा इत्यादी स्पर्धा उत्साहवर्धक, आनंदी वातावरणात शांततेत पार पडल्या. मुला, मुलींची धावण्याच्या स्पर्धा दिवस चालू होत्या.

  • Related Posts

    धाराशिव: तुळजाभवानी स्टेडियमवर खासगी अकॅडमींची गर्दी, सर्वसामान्यांच्या व्यायामात अडथळा

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – शहरातील नागरिकांसाठी व्यायामाचे एकमेव ठिकाण असलेल्या तुळजाभवानी स्टेडियमवर खासगी क्रीडा अकॅडमींनी मोठ्या प्रमाणावर जागा व्यापल्याने सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे. सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत व्यायामासाठी येणाऱ्या…

    अ‍ॅथलेटिक्समध्ये महाराष्ट्राला 3 सुवर्ण, रिक्षा डायव्हरच्या मुलाची सुवर्ण कामगिरीचैतन्य, साहिल, सिध्दीची सुवर्णमय कामगिरी, मीनाक्षीला रौप्य

    Spread the love

    Spread the loveनवी दिल्ली : अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्राच्या पॅरा खेळाडूंनी 3 सुवर्णांसह 1 रौप्य पदके जिंकून खेलो इंडिया पॅरा स्पर्धेतील अ‍ॅथलेटिक्सचे मैदान गाजवले. 100 मीटर शर्यतीत अकोलाच्या चैतन्य पाठकसह गोळाफेकीत कराडच्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *