अष्टविनायक चौक ते बाबर चौक दरम्यानचे रस्त्यातील पोल हटविले शिवसेना शहर संघटक प्रशांत (बापू) साळुंके यांच्या पाठपुराव्याला यश

Spread the love

धाराशिव दि.११ (प्रतिनिधी) – शहरातील प्रभाग क्रमांक चार मधील अष्टविनायक चौक ते बाबर चौक या कच्च्या रस्त्यावर मजबूत व दणकट तसेच टिकाऊ हॉट मिक्स डांबरीकरण करण्याचे काम सुरू आहे. मात्र या रस्त्याच्या अगदी मधोमध विद्युत पोल असल्यामुळे वाहतुकीस अडचण निर्माण होत होती. ते काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे वारंवार मागण्या निवेदने व आंदोलने केली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ते पोल दि.११ जून रोजी पाठविले आहेत. त्यासाठी शिवसेना (ठाकरे) चे धाराशिव शहर संघटक प्रशांत उर्फ बापू साळुंके यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. साळुंके यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आल्यामुळे या परिसरातील नागरिकांना रस्त्यातील पोलच्या अडथळ्याचा सामना करावा लागत होता. मात्र आता ती समस्या कायमस्वरूपी दूर झाली आहे.

धाराशिव शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील अष्टविनायक चौक ते बाबर चौक या कच्च्या रस्त्याचे हॉट मिक्स डांबरीकरण रस्ता करण्यासाठी आमदार कैलास पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून ९६ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. ते काम करताना रस्त्याच्या मधोमध १८ विद्युत पोल उभे होते. त्यामुळे वाहतुकीला प्रचंड मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत होता. ते काढण्यासाठी शिवसेना (ठाकरे) चे धाराशिव शहर संघटक प्रशांत उर्फ बापू साळुंके यांनी विद्युत वितरण कंपनी तसेच जिल्हा प्रशासनाकडे वारंवार निवेदने व आंदोलन करून ही मागणी सातत्याने लावून धरली. त्यांच्या पाठपुराव्यामुळे दि.११ जून रोजी ते वाहतुकीस अडथळा ठरत असलेले १८ विद्युत पोल जेसीबीच्या साह्याने हटविण्यात आले आहेत. त्या रस्त्याच्या बाजूला नवीन १८ पोल आणि २ डी.पी. बसविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे साळुंके हे अपघातात जखमी झाल्यामुळे ते रुग्णालयात बेडवर उपचार घेत आहेत. मात्र, समाजसेवेचा वसा जपत त्यांनी दवाखान्यातून या कामाचा फोनद्वारे पाठपुरावा करून शासकीय यंत्रणेला कामाला लावले आहे. ते काम अर्धवट न ठेवता पूर्ण केलेले आहे. त्यांच्या सामाजिक बांधिलकीच्या कृतीमुळे या भागातील नागरिकांची कायमची अडचण दूर झालेली आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक ४ मधील नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून साळुंके यांच्या कामाचे कौतुक करीत आहेत.

  • Related Posts

    लोहटा पूर्व गावास महसुली दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा! महसूल मंत्री यांच्या उपस्थितीत बैठक , आमदार कैलास पाटील यांची माहिती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव ता. 14: कळंब तालुक्यातील लोहटा (पूर्व) गावाला महसुली ओळख मिळवण्यासाठी लढा द्यावा लागला होता अखेर या गावास आता महसूली दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती आमदार कैलास…

    श्री. सिद्धीविनायक सोशल फाऊंडेशनचा सहकार सन्मान उपक्रम जबाबदारीच्या पलीकडचा संवाद

    Spread the love

    Spread the loveधाराशिव सहकार दिनाचे औचित्य साधून श्री. सिद्धीविनायक सोशल फाऊंडेशन, धाराशिव यांच्या वतीने संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या संकल्पनेनुसार, धाराशिव जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *