मराठी माणसाच्या लढ्याला यश; हिंदी सक्तीचा निर्णय मागे

Spread the love

धाराशिवमध्ये जल्लोष, मराठी जनतेचा विजय साजरा

धाराशिव – राज्य शासनाने हिंदी सक्तीचा निर्णय अखेर मागे घेतल्याने धाराशिवसह राज्यभरातील मराठी भाषाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मराठी माणसाच्या एकजुटीच्या लढ्याला यश आल्याने आज सोमवार, ३० जून २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व चौकात मराठी जनतेच्या वतीने विजय उत्सव साजरा करण्यात आला.

“मराठी माणसाच्या आवाजासमोर सरकार झुकले”, “ही मराठी अस्मितेची जिंकलेली लढाई आहे”, अशा शब्दांत उपस्थितांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी फटाके फोडून, पेढे वाटून आणि ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणांनी चौक दुमदुमला.

तमाम महाराष्ट्रप्रेमी मराठी जनता धाराशिव यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी नितीन तावडे,सुरेश माळाळे,डी.के. शेख,दौलत निपाणीकर,शीला उंबरे,रवी वाघमारे,दिनेश बंडगर, खलील सय्यद,सोमनाथ गुरव,अग्निवेश शिंदे,दादा कांबळे,निलेश जाधव,तुषार निंबाळकर,सिद्धार्थ बनसोडे,सुमित बागल,धनंजय राऊत,रोहित बागल,राकेश सूर्यवंशी,अभिराज कदम,मनोज उंबरे,सुनील वाघ,बंडू आदरकर,सह्याद्री राजेनिंबाळकर,ॲड.संजय भोरे,सुरेश गवळी,गणेश साळुंके,अशोक बनसोडे,अभिमान पेठे,अजित बाकले, देवानंद एडके,राणा बनसोडे,निलेश शिंदे,रणवीर इंगळे,पंकज पाटील,हर्षद ठवरे,अविनाश शेरखाने,जगदीश शिंदे,सरफराज काझी,सुनील बुडूरकर,सिद्धेश्वर कोळी,मुजीब काझी,प्रभाकर लोंढे,मुकेश चौगुले,अंकुश चौगुले,मिलिंद चांडगे,हनुमंत देवकते,मंगेश काटे,अक्षय जोगदंड,सात्विक दंडनाईक,बिलाल तांबोळी,प्रदीप साळुंके,महेश उपासे,संजय जगधने,अंकुश पेठे यांचेसह अनेक पत्रकार, विद्यार्थी, नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

  • Related Posts

    लोहटा पूर्व गावास महसुली दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा! महसूल मंत्री यांच्या उपस्थितीत बैठक , आमदार कैलास पाटील यांची माहिती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव ता. 14: कळंब तालुक्यातील लोहटा (पूर्व) गावाला महसुली ओळख मिळवण्यासाठी लढा द्यावा लागला होता अखेर या गावास आता महसूली दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती आमदार कैलास…

    श्री. सिद्धीविनायक सोशल फाऊंडेशनचा सहकार सन्मान उपक्रम जबाबदारीच्या पलीकडचा संवाद

    Spread the love

    Spread the loveधाराशिव सहकार दिनाचे औचित्य साधून श्री. सिद्धीविनायक सोशल फाऊंडेशन, धाराशिव यांच्या वतीने संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या संकल्पनेनुसार, धाराशिव जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *