
भूम-परंडा-वाशी रेल्वे कृती समितीच्या शिष्टमंडळाने दिले खासदारांना निवेदन
धाराशिव – भूम-परंडा-वाशी रेल्वे कृती समितीच्या शिष्टमंडळाने धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश निंबाळकर यांची भेट घेऊन पंढरपूर-शेगाव या प्रस्तावित रेल्वेमार्गाच्या कामांना गती मिळावी, निधीची तातडीने तरतूद करावी व लवकरात लवकर रेल्वेसेवा सुरू व्हावी, यासाठी निवेदन सादर केले.
या मार्गामुळे खामगाव, जालना, गेवराई, वाशी, भूम, परंडा, कुडुवाडी व पंढरपूरमार्गे कोल्हापूर ही शहरे थेट रेल्वे जाळ्यात समाविष्ट होतील. त्यामुळे शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी व सामान्य प्रवाशांसाठी हा मार्ग अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
शिष्टमंडळाने खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याकडे पुढील मागण्या मांडल्या:
- प्रस्तावित रेल्वेमार्गाच्या उर्वरित कामांना तातडीने मंजुरी मिळावी.
- केंद्र शासनाकडून आवश्यक निधीची त्वरित तरतूद करण्यात यावी.
- संसद अधिवेशनात हा विषय प्रभावीपणे मांडण्यात यावा.
- संबंधित लोकप्रतिनिधींची एकत्र बैठक घेऊन पुढील संयुक्त पाठपुरावा करण्यात यावा. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या निवेदनाची गांभीर्याने दखल घेत, “या विषयावर मी संसदेत ठामपणे आवाज उठवणार असून, लवकरच रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन निधी मंजुरीसाठी आवश्यक त्या सर्व पातळ्यांवर प्रयत्न करणार आहे,” असे आश्वासन दिले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे जिल्हाध्यक्ष तानाजी पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भूम परंडा वाशी विधानसभा अध्यक्ष नवनाथ जगताप, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संजय पाटील आरसोलीकर, काँग्रेस पक्षाचे विलास शाळू शिवसेना उबाठा पक्षाचे दिलीप शाळू शिवसेना उबाठा पक्षाचे तालुकाप्रमुख अनिल शेंडगे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष अॅड.रामराजे साळुंखे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप देशमुख, राजकीय कट्टाचे संपादक प्राचार्य सतीश मातने, दैनिक पुण्यनगरीचे भूम तालुका प्रतिनिधी प्रमोद कांबळे, दैनिक पुढारीचे अब्बास सय्यद,तानाजी सुपेकर,संतोष वराळे,आदिनाथ पालके,अलीम शेख,वसंत यादव, दिगंबर ढगे,अमृत भोरे, फैजान काजी, पांडुरंग धस, अॅड. रमेश काळे, अतुल शेळके, श्रीराम खंडागळे उपस्थित होते.