पोलीस प्राधिकरणाच्या माध्यमातून 8 वर्षात 6200 प्रकरणांचा निपटारा – उमाकांत मिटकरी यांची माहिती

Spread the love

धाराशिव (प्रतिनिधी) महाराष्ट्र पोलीस प्राधिकरणाच्या मदतीने गेल्या 8 वर्षांमध्ये महाराष्ट्र राज्यातील 6200 प्रकरणांचा निपटारा केला.आणि पीडित लोकांसाठी काम केल्याचा आनंद आपल्याला होतोय अशी माहिती महाराष्ट्र पोलीस प्राधिकरण न्यायिक सदस्य उमाकांत मिटकर यांनी मिट द प्रेस कार्यक्रमातून दिली. धाराशिव जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष देविदास पाठक आणि सरचिटणीस रवींद्र केसकर यांनी मिटकर यांचे स्वागत केले. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन मिटकर यांच्या हस्ते करण्यात आले.
मीट द प्रेस कार्यक्रमाची संकल्पना आणि भूमिका अध्यक्ष देवदास पाठक यांनी प्रास्ताविक करताना विशद केली.
पोलीस प्राधिकरणा संदर्भात बोलताना मिटकर म्हणाले, 2006 मध्ये न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यामध्ये पोलीस प्राधिकरण स्थापन करण्यात आले या माध्यमातून पीडित लोकांना न्याय देण्याचं काम अविरत सुरू आहे.
भटक्या समूहातील जमाती करिता मिटकर यांनी स्वत:ला वाहून घेतले होते. पालावरची शाळा हा त्या उपक्रमाचा एक भाग होता. भटक्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी,त्यांच्या उदार निर्वाह करिता, केलेले प्रयत्न आणि संघर्षमय भूतकाळाला मिटकरी यांनी उजाळा दिला, गेल्या 23 वर्षा मध्ये केवळ निस्वार्थी वृत्तीने,पीडित लोकांसाठी केलेल्या कामाचा जीवनपट उमाकांत मिटकर यांनी माध्यम प्रतिनिधी समोर मांडला.
पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तक्रारींचा महाराष्ट्र पोलीस प्राधिकरण मध्ये चौकशी, पडताळणी नंतर न्यायिक आदेश देण्याचे काम होते. गेल्या आठ वर्षाच्या काळामध्ये 6200 प्रकरणांचा न्यायिक प्राधिकरणाने प्राधान्याने निफ्टारा केल्याचे मिटकर यांनी सांगितले. सध्या केवळ 89 प्रकरणे विविध कारणास्तव प्रलंबित आहेत. प्राधिकरणाकडे तक्रार झाल्यापासून अवघ्या तीन महिन्यांमध्ये प्रकरण निकाली काढले जाते त्यामुळे, ज्या कोणाला या संदभार्तील आपले घराणे तक्रारी द्यायचे आहेत अशा तक्रप्रदारांनी केवळ साधा अर्ज प्राधिकरणाकडे पाठवल्यास त्याच्यावर कार्यवाही होते. जनतेने प्राधिकरणाच्या लाभ घ्यावा असे आवाहन देखील मिटकर यांनी केले. यावेळी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना मिटकर यांनी समाधानकारक उत्तरे दिली. या कार्यक्रमाला धाराशिव जिल्हा पत्रकार संघ,धाराशिव जिल्हा मराठी पत्रकार संघ, व्हॉइस आॅफ मीडिया संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र केसकर तर आभार गोविंदसिंह राजपूत यांनी मांडले.

  • Related Posts

    गरजूंसाठी मोफत व सुलभ न्याय मिळवून देणे हेच विधी सेवा प्राधिकरणाचे ध्येय ,सचिव भाग्यश्री पाटील

    Spread the love

    Spread the loveसामाजिक समता सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती धनादेशांचे वितरण धाराशिव -: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष,संत…

    धाराशिव जिल्हयातील महिलांनी आर्थिक,सामाजिक व राजकीय दृष्टया सक्षम व्हावे किर्ती किरण पुजार,जिल्हाधिकारी धाराशिव यांचे आवाहन

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय धाराशिव व महिला व बाल विकास विभाग जि.प.धाराशिव व महिला आर्थिक विकास महामंडळ धाराशिव यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक महिला…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *