
धाराशिव – धाराशिव जिल्हा विधीज्ञ मंडळाच्या अध्यक्षपदी ऍड अमोल वरुडकर यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा व नूतन कार्यकारणी सदस्यांचा तुळजाभवानी मंदिर संस्थांचे मुख्य महंत
तुकोजी बुवा व यशदा मल्टीस्टेट चे अध्यक्ष सुधीर सस्ते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
धाराशिव जिल्हा मंडळाच्या अध्यक्ष व कार्यकारणीची निवडणूक नुकतीच पार पडली असून यामध्ये ऍड वरुडकर यांची अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. त्यामुळे ऍड अमोल वरुडकर, उपाध्यक्ष ऍड नितीन लोमटे व ऍड प्रमोद वाकुरे, कोषाध्यक्ष ऍड एन डी पाटील, सहसचिव ऍड भाग्यश्री रणखांब व महिला प्रतिनिधी ऍड उज्वला इंगळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विशाल छत्रे, मनोज गवळी, ऍड नितिन भोसले, सुभाष पवार व धैर्यशील सस्ते आदी उपस्थित होते.