
धाराशिव/ प्रतिनिधी -: जिल्ह्यातील शिवाजीनगर गावात चार वर्षांपूर्वी घडलेल्या मारहाणीच्या प्रकरणात आज जिल्हा न्यायालायाने (वर्ग एक) मोठा निर्णय घेतला. पुरावा अपुरा असल्याने न्यायालयाने सर्व पाच आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली आहे. या निकालामुळे गावात आणि न्यायालयीन वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे.
26 जानेवारी 2020 रोजी घडली होती, गावातील एक महिला चंदा दाणे लिंब तोडायला शेतात गेली होती, आणि त्यावेळी फिर्यादी संदीप शिंदे यांच्या आईने तिला लिंब तोडण्यास मनाई केली. एवढ्या कारणावरून वाद सुरू झाला आणि त्याचं रूपांतर मारहाणीमध्ये झालं, अशी तक्रार पोलिसांत दाखल झाली होती.
आरोपींनी – बाळासाहेब शिंदे, सोमनाथ निंबाळकर आणि इतरांनी – त्यांना, त्यांच्या पत्नीला, आईला व दोन मामांना घरासमोर मारहाण केली. लाथा-बुक्क्या, काटे, आणि गंभीर इजा झाल्याचा आरोप होता. त्यामुळे भादंवि कलम 324, 323, 504 आणि 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला गेला.
जेव्हा खटला चालू झाला, तेव्हा सरकारी वकिलांकडून सादर केलेले साक्षीपुरावे अपुरे पडले, तर चार जखमी साक्षीदारांची तपासणी झाली, पण पुरावा ‘सबळ’ नसल्याने जिल्हा न्यायाधीश वर्ग एक या कोर्टाने सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केलं.
आरोपींच्या वतीने अॅड. निलेश दत्तात्रय बारखडे-पाटील यांनी अतिशय प्रभावी बाजू मांडली तर त्यांना अॅड. आनंद पाटील आणि अॅड. धनंजय मडके यांचे सहकार्य लाभले.
हा निकाल कायदेशीरदृष्ट्या महत्त्वाचा असून यातून पुन्हा एकदा स्पष्ट होतं की न्यायालय ‘पुराव्यावर’ चालतं – भावना, गोंधळ किंवा तर्कावर नाही असे बोलले जात आहे.