रमजान ईदच्या पूर्वसंध्येला मुस्लिम समाजातील गोरगरीब कुटुंबांना साहित्य वाटप

Spread the love

शिवसेनेचे शहर संघटक प्रशांत (बापू) साळुंके यांचा उपक्रम

धाराशिव – पवित्र रमजान ईदच्या सणानिमित्त मुस्लिम समाजातील गोरगरीब कुटुंबांना रमजान ईद सणासाठी लागणार्‍या साहित्याचे किट वाटप करण्यात आले. शिवसेनेचे शहर संघटक प्रशांत (बापू) साळुंके यांच्या पुढाकाराने प्रभाग 4 मध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. बहुजन योद्धा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय (नाना) शिंगाडे व प्रशांत (बापू) साळुंके यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ ईद सणाच्या पूर्वसंध्येला रविवार, 30 मार्च रोजी करण्यात आला.

मुस्लिम समाजात सर्वात मोठा रमजान ईदचा सण आहे. आर्थिक परिस्थिती अथवा इतर अडचणीमुळे अनेकजण हा सण आनंदाने साजरा करु शकत नाहीत. दोन दिवसांपूर्वीच दिलेल्या इफ्तार पार्टीनंतर समाजातील ही परिस्थिती ओळखून प्रभाग 4 मधील गालिब नगरसह मिल्ली कॉलनी, शिरीन कॉलनी, रजा कॉलनी भागातील गोरगरीब मुस्लिम कुटुंबांची माहिती श्री.साळुंके यांनी घेतली. त्यानंतर रविवारी सकाळी रमजान ईद सणासाठी लागणार्‍या साहित्याचे किट गोरगरीब कुटुंबीयांच्या घरोघरी जाऊन वाटप केले. यावेळी जमशेद पठाण, पाशाभाई शेख, युवराज राठोड, रोहित गाभणे, प्रतीक कदम अजित बाकले, दत्ता सोकांडे, बच्चा गाभणे यांच्यासह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मुस्लिम बांधवांनी हिंदु बांधवांना देखील ईदच्या शुभेच्छा दिल्या.

शिवसेनेचे शहर संघटक प्रशांत (बापू) साळुंके हे दरवर्षी विविध धार्मिक सण, उत्सवांमध्ये प्रत्यक्ष सहभागी होऊन कार्यरत असतात. गणेशोत्सव, नवरात्र महोत्सव, रमजान ईद असो अथवा इतर सण उत्सवांबरोबर प्रभाग 4 मधील नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी शासनदरबारी सतत पाठपुरावा करतात. या प्रभागामधील समस्यांसाठी खासदार, आमदारांकडे पाठपुरावा करुन मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन घेतला. या निधीमधून रस्ते, नाल्या, हायमास्ट लॅम्पची रखडलेली कामे पूर्ण झाली असून पावसाळ्यात नागरिकांची होणारी गैरसोय दूर झाली आहे.

  • Related Posts

    लोहटा पूर्व गावास महसुली दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा! महसूल मंत्री यांच्या उपस्थितीत बैठक , आमदार कैलास पाटील यांची माहिती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव ता. 14: कळंब तालुक्यातील लोहटा (पूर्व) गावाला महसुली ओळख मिळवण्यासाठी लढा द्यावा लागला होता अखेर या गावास आता महसूली दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती आमदार कैलास…

    श्री. सिद्धीविनायक सोशल फाऊंडेशनचा सहकार सन्मान उपक्रम जबाबदारीच्या पलीकडचा संवाद

    Spread the love

    Spread the loveधाराशिव सहकार दिनाचे औचित्य साधून श्री. सिद्धीविनायक सोशल फाऊंडेशन, धाराशिव यांच्या वतीने संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या संकल्पनेनुसार, धाराशिव जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *