ठाकरे नगर नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने महिलांसाठी तीर्थक्षेत्र दर्शन सहल

Spread the love

महाराष्ट्रातील प्रसिध्द देवस्थानच्या दर्शनाचा योग – प्रशांत (बापू) साळुंके

धाराशिव – शहरातील ठाकरे नगर नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने महिलांसाठी तीर्थक्षेत्र दर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाच्या आधारस्तंभ श्यामलताई साळुंके यांच्या पुढाकाराने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मंडळाचे मार्गदर्शक प्रशांत (बापू) साळुंके यांनी दिली.

ठाकरे नगर नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने दरवर्षी महिलांसाठी विविध कार्यक्रम घेण्यात येतात. विशेषत: नवरात्र महोत्सवात धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक प्रबोधनाचे कार्य हे मंडळ करत आहे. विशेष म्हणजे या नवरात्र महोत्सव मंडळाच्या कार्यकारिणीत सर्व महिलांचा समावेश असतो. या महिलांना तीर्थक्षेत्र दर्शनाची संधी मिळावी यासाठी दर्शन सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवार, 11 मे रोजी पहाटे तीन वाजता ठाकरे नगर येथून ही तीर्थक्षेत्र दर्शन सहल मार्गस्थ होईल. या दर्शन सहलीकरिता दोन बसची व्यवस्था करण्यात आली असून मंडळातील एकुण 92 महिला यात सहभागी होणार आहेत. दोन दिवसांची ही दर्शन सहल असणार आहे.

या तीर्थक्षेत्राच्या दर्शनाचा लाभ
ठाकरे नगर नवरात्र महोत्सव मंडळाच्या या दर्शन सहलीत तीर्थक्षेत्र आदमापूर येथील संत बाळू मामा देवस्थान, साडेतीन शक्तिपीठांपैकी पूर्णपीठ असलेली श्री महालक्ष्मी, क्ष्रीक्षेत्र ज्योतिबा, नृसिंहवाडी देवस्थानच्या दर्शनाचा लाभ महिलांना मिळणार असल्याचे मंडळाचे मार्गदर्शक प्रशांत (बापू) साळुंके यांनी सांगितले.

  • Related Posts

    लोहटा पूर्व गावास महसुली दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा! महसूल मंत्री यांच्या उपस्थितीत बैठक , आमदार कैलास पाटील यांची माहिती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव ता. 14: कळंब तालुक्यातील लोहटा (पूर्व) गावाला महसुली ओळख मिळवण्यासाठी लढा द्यावा लागला होता अखेर या गावास आता महसूली दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती आमदार कैलास…

    श्री. सिद्धीविनायक सोशल फाऊंडेशनचा सहकार सन्मान उपक्रम जबाबदारीच्या पलीकडचा संवाद

    Spread the love

    Spread the loveधाराशिव सहकार दिनाचे औचित्य साधून श्री. सिद्धीविनायक सोशल फाऊंडेशन, धाराशिव यांच्या वतीने संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या संकल्पनेनुसार, धाराशिव जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *