खरा दानशूर, 1 कोटीचं दान केलं पण नाव समोर नाही येऊ दिलं

Spread the love

श्रीतुळजाभवानी चरणी अज्ञात भक्ताकडून 1 किलो 100 ग्रॅम वजनाची सोन्याची बिस्किटे अर्पण

तुळजापूर – केलेलं दान एका हाताचे दुसऱ्या हाताला समजू नये असे म्हणतात आणि जो हा नियम पाळतो तोच खरा दानशूर मानला जातो. जाहिरातबाजीच्या दुनियेत अपवादात्मक स्थितीत अशी व्यक्ती सापडते. महाराष्ट्रची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या चरणी एका भक्ताने तब्बल एक कोटी रुपयांचं सुवर्ण दान केलं आहे.

नियमित मोजणीसाठी शुक्रवार दि 28 मार्च 2025 रोजी तुळजाभवानी मंदिरातील दानपेटया उघडल्या असता देवीजींच्या मूळ गभऱ्यासमोर असलेल्या चोपदार दरवाजातील सिंहासन पेटी क्र 2 मध्ये सोन्याची 11 बिस्किटे आढळून आली. यातील प्रत्येक बिस्कीट 100 ग्रॅम वजनाचे असून त्याचे एकूण वजन 1100 ग्रॅम आहे. बाजारभावानुसार या सोन्याची किंमत जवळपास 1 कोटी इतकी आहे.
मंदिर संस्थान येथे दानपेट्यांची मोजणी दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी होत असल्याने हे दान बुधवार किंवा गुरुवारी झाले आहे. या बिस्किटांवर त्याचे वजन 100 ग्रॅम आणि शुद्धता 999.0 असे लिहिले आहे.

मंदिर संस्थान कडून सुरक्षा कर्मचाऱ्यांचा सन्मान

अशा प्रकारे दान करताना भाविकांना सुरक्षित वातावरण मंदिर परिसर व गाभाऱ्यात ठेवणे तसेच भाविकांचे दान योग्य ठिकाणी जाईल याबाबत योग्य दक्षता मंदिर संस्थानचे सुरक्षा अधिकारी व कर्मचारी घेत असतात. यास्तव कौतुकाची थाप म्हणून मंदिर संस्थान कडून कर्तव्यावर उपस्थित कर्मचाऱ्यांचा श्रीफळ व देवींजींचा फोटो देऊन सन्मान केला.

  • Related Posts

    मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना८०० यात्रेकरू तीर्थयात्रेसाठी विशेष रेल्वेने अयोध्येकडे रवाना

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत आज धाराशिव येथून ८०० ज्येष्ठ नागरिकांना घेऊन जाणारी जिल्हयातील पहिली रेल्वे अयोध्येकडे रवाना झाली.समाज कल्याणचे सहायक आयुक्त श्री.बी.जी.अरवत,नितीन काळे,भारतीय रेल्वेचे अधिकारी श्री.गुरुराज सोना…

    धाराशिव जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात साजरी

    Spread the love

    Spread the loveधाराशिव : जिल्ह्यात मुस्लिम बांधवांनी रमजान ईद तथा ईद उल फितरचा पवित्र सण मोठ्या उत्साहात आणि धार्मिक श्रद्धेने साजरा केला. शहरातील ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *