
पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांचे जिल्ह्याच्या विकासासाठी पाऊस
धाराशिव – धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील भगवा ध्वज स्तंभ व नळदुर्ग भुईकोट किल्ल्यामध्ये ध्वज स्तंभ उभारण्यासाठी अनुसूचित जाती घटक कार्यक्रम २०२४-२५ मधून नाविन्यपूर्ण योजनेमधून अनुक्रमे ९१ लाख व ९७ लाख रुपये अशी १ कोटी ९८ लाख रुपयांच्या निधी उपलब्ध करून करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दि.११ मार्च रोजी दिले आहेत. त्यामुळे या वर्षी दोन स्तंभ उभारून जिल्ह्याच्या संस्कृतिक वैभवात व सुशोभीकरण होण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे मागील आठवड्यातच पालकमंत्र्यांनी शिष्टमंडळास ध्वज स्तंभ उभे करणार असल्याचे आश्वासन दिले होते. वाढदिवसाच्या आतच त्याची प्रत्यक्ष कृती करण्यास त्यांनी आदेश दिल्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला गती देणारे खरे पालकमंत्री लाभले असे असे म्हणावे लागेल.
धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक हा शहराच्या मध्यवर्ती भागात असून हा चौक रहदारीने कायम गजबजलेला असतो. हा चौक हा धाराशिव शहरातील मुख्य आकर्षण असून या चौकामध्ये ध्वजस्तंभ उभारल्यास शहराच्या सौंदर्यात भर पडण्यास मदत होणार आहे. तसेच नळदुर्ग येथील भुईकोट किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील धाराशिव जिल्ह्यामधील एक किल्ला आहे. नळदुर्ग किल्ला एक प्रसिद्ध प्राचीन किल्ला असून नळदुर्ग हा महाराष्ट्रातील भुईकोट किल्ल्यातील सर्वांत मोठा किल्ला आहे. हा किल्ला धाराशिव जिल्ह्यातील मुख्य आकर्षण असून या किल्ल्यामध्ये ध्वजस्तंभ उभारल्यास किल्ल्याच्या सौंदर्यात भर पडण्यास मदत होणार आहे.
त्यामुळे जिल्हा वार्षिक योजना अनुसूचित जाती घटक कार्यक्रम सन २०२४-२५ अंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेतून धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ध्वज स्तंभ उभारणेसाठी ९१ लाख तसेच तसेच तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग भुईकोट किल्ल्यात ध्वज स्तंभ उभारण्यासाठी ९७ लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात यावा, असे निर्देश पालकमंत्री सरनाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. पालकमंत्र्यांनी जिल्ह्याचा पदभार स्वीकारल्यापासून जिल्हा विकासासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबी पडताळून सकारात्मक दृष्टीकोनातून विकासात्मक पावले टाकण्यास प्रारंभ केल्यामुळे जिल्ह्यात असलेला अविकसित पणाचा कलंक लवकरच पुसूला विकासाच्या प्रवाहात जिल्हा येईल अशी आशा जिल्हावासियांना लागली आहे.