
पालकमंत्री प्रताप सरनाईक धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना धाराशिव जिल्ह्यात भव्य दिव्य भगवा ध्वज अभिमानाने फडकवण्यासाठी १५१ फुटांचा ध्वज स्तंभ उभारवा अशी मागणी धाराशिव जिल्हा सकल मराठा समाजाने पालकमंत्र्यांकडे केली होती. सोबतच धाराशिव जिल्ह्यातील विध्यार्थ्यांच्या भविष्याच्या विचार करून जिल्ह्यात एखादे मराठा भवन उभारावे अशीही मागणी यावेळी मराठा बांधवानी पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली होती. स्थानिकांच्या मागण्या समजून घेऊन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी त्यांच्या ओवळा माजीवाडा मतदार संघात सुरु असलेल्या मराठा भावनाच्या कामाची पाहणी करण्याची सूचना यावेळी मराठा बांधवांना केली होती. सोबतच माजीवाडा सिग्नल येथील भव्य १०१ फूट उंच तिरंगा झेंडा स्तंभ पाहण्यासाठी देखील स्थानिक बांधवांना सांगितले होते.
धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या सूचनेनंतर धाराशिव जिल्ह्याचे संपर्कप्रमुख नितीन लांडगे यांच्या माध्यमातून धाराशिव जिल्हा सकल मराठा बांधवांच्या शिष्टमंडळाला ठाण्यात व मीरा भाईंदरला नेण्याची व्यवस्था व पाहणी दौरा करण्यात आला. मराठा भवनाचे युद्ध पातळीवर सुरु असलेले कामं सोबतच माजी वाडा येथील भव्य तिरंगा स्तंभाची पाहणी सर्व बांधवांनी केली. या पाहणी दौऱ्यात संपूर्ण विकास कामांचा लेखा जोखा समजून घेत, आवश्यक गोष्टी टिपून घेऊन या वास्तूंचा अभ्यास शिष्टमंडळाने केला. पाहणी दौऱ्यानंतर सर्व मराठा बांधवांनची व राज्याचे परिवहन मंत्री, धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची सामूहिक बैठक संपन्न झाली. पालकमंत्र्यांच्या भेटीत धाराशिव येथील मराठा बांधवांनी आपले अनुभव व सूचना प्रताप सरनाईक यांना सांगितल्या. उपस्थित सर्व मराठा बांधवांच्या शिष्टमंडळाचं म्हणणं लक्षात घेऊन लवकरच धाराशिव जिल्हा सकल मराठा बांधवांचे स्वप्न पूर्ण होईल असा शब्द यावेळी मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला. यावेळी नितीन लांडगे, सुधीर अण्णा पाटील,विनोद गपाट,बलराज रणदिवे, चेतन कात्रे, रोहित पडवळ, अमोल जाधव, अक्षय नाईकवाडी, संकेत सूर्यवंशी, प्रदीप सूर्यवंशी, संदीप इंगळे,गणेश साळुंके, खंडू राऊत, आबा वायकर, स्वप्नील पाटील,अमित पाटील,इत्यादी उपस्थित होते.