
धाराशिव – बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. संतप्त जमावाने धाराशिव जिल्ह्यात विविध ठिकाणी बंद पुकारला असून, या आंदोलनाला संपूर्ण समाजाचा पाठिंबा मिळत आहे.
ढोकी येथेही बंद पाळण्यात आला. यावेळी “नामर्द आरोपीना फाशीची शिक्षा द्या” अशा घोषणांसह जोडे मारो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात बारा वाड्या, तेरावे तेर, चौदावी ढोकी, व्यापारी संघटना तसेच अखिल भारतीय छावा संघटनेने सक्रिय सहभाग घेतला आणि आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा दिला.