कंत्राटदाराच्या हव्यासापोटी नगरोत्थान अभियानांतर्गत 140 कोटीची कामे अडविली; महाविकास आघाडी करणार उपोषण आंदोलन

Spread the love

धाराशिव – नगरोत्थान महाअभियानांतर्गत धाराशिव नगरपालिकेस मंजूर झालेल्या 140 कोटी रुपयांच्या 59 डीपी रस्त्यांची कामे कंत्राटदारांच्या हव्यासापोटी जाणूनबुजून अडवून ठेवल्याच्या निषेधार्थ आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, नगरोत्थान महाअभियान अंतर्गत धाराशिव नगर पालिकेला मंजूर झालेल्या 140 कोटी रुपये निधीच्या 59 डीपी रस्त्यांची कामे मागील नऊ महिन्यांपासून जाणूनबुजून रखडवून ठेवली आहेत. या कामांना प्रशासकीय 23 फेब्रुवारी 2024 रोजी मंजुरी प्राप्त झालेली असून, नियमानुसार सात दिवसांत निविदा प्रक्रिया सुरू करून तीन महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणे आवश्यक होते. परंतु अद्यापही या कामांना सुरूवात झालेली नाही. 06 जानेवारी 2025 रोजी नागरीकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्याची कामे तात्काळ चालु करणेसाठी रास्ता रोको आंदोलन केले होते. त्या आंदोलनावेळी धाराशिव नगर परिषदेच्या मुख्याधिकार्यांनी सदर कामांचे निविदा प्रक्रिया अंतिम टप्यात असल्याचे व सदर कामे 28/02/2025 रोजी पर्यंत प्रत्यक्ष सुरू करणार असल्याचे लेखी पत्राद्वारे आश्वासन दिले. सदर आंदोलनामुळे 7 महिन्यापासुन रखडलेल्या निविदा उघडण्यात आल्या. परंतु सदरील निविदा प्रक्रिया कंत्राटदारांच्या हव्यासापोटी 15 ते 16 टक्के जास्तीच्या दराची निविदा मंजुर करण्यासाठी सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या आडून कंत्राटदार नगर पालिका प्रशासनावर दबाव आणत आहेत. सदर कामे ही नगरोत्थान योजनेतील असल्याने 25 टक्के हिस्सा नगर पालिकेला भरावा लागतो. ह्या 15 ते 16 टक्के आगाऊची निविदा मंजूर केल्या तर विनाकारण नगर परिषदेवर जवळपास 35 ते 40 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार आहे. त्यामुळे कंत्राटदारांना कार्यारंभ आदेश देऊन सदरील कामे तत्काळ सुरु करण्याबाबत मुख्याधिकारी नगरपरिषद धाराशिव यांनी आदेशित करावे. अन्यथा महाविकास आघाडीच्या वतीने 15/04/2025 रोजी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव समोर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यावेळी शिवसेना शहरप्रमुख सोमनाथ गुरव, काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, प्रशांत पाटील, प्रवीण कोकाटे, रवि वाघमारे, राजाभाऊ पवार,प्रदीप मुंडे,उमेश राजेनिंबाळकर, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष शेखर घोडके, खलील सय्यद, सिद्धार्थ बनसोडे, प्रशांत साळुंके, बंडू आदरकर, गणेश खोचरे, पंकज पाटील, मिनिल काकडे, तुषार निंबाळकर, इस्माईल शेख, धनंजय राऊत, सुमित बागल, नीलेश साळुंके, जयंत देशमुख, सुनील वाघ, कालिदास शेरकर, यशवंत शहापालक, नवज्योत शिंगाडे, नाना घाटगे, मुजीब काझी, संभाजी दळवी, अजित बाकले,हणमंत देवकते, दिनेश बंडगर, सह्याद्री राजेनिंबाळकर, अजिंक्य राजेनिंबाळकर, साबेर सय्यद, योगेश सोन्ने पाटील, अ‍ॅड. आडे, अभिजित देशमुख, धनंजय पाटील, राम साळुंके, महेश उपासे, अमर गुंड, गणेश राजेनिंबाळकर, प्रशांत पाटील, विनोद केजकर, ईस्माइल काझी, बिलाल कुरेशी, अमोल नाईकवाडी, भीमराव चव्हाण, औदुंबर पांचाळ, अक्षय जोगदंड, अभिषेक पाटील, विजय माकुरवार, अशोक बनसोडे,बाळसाहेब जेवे, दत्तात्रय गोरे, सौरभ गायकवाड यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Related Posts

    प्रविण गायकवाड हल्ला प्रकरणी मराठा समाज आक्रमक – आरोपींवर ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल करा, अन्यथा अक्कलकोट व सोलापूर बंदचा इशारा

    Spread the love

    Spread the loveसोलापूर  (प्रतिनिधी): अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर मराठा समाजात तीव्र संताप उसळला आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा…

    पुणे येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळा विटंबना प्रकरणी आरोपीवर कठोर कार्यवाही व्हावी यासाठी राष्ट्रसेवा दलाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

    Spread the love

    Spread the loveपुणे येथे रेल्वेस्टेशन परिसरात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळयाची विटंबना करण्यात आली. यामुळे धाराशिव येथील राष्ट्र सेवा दलाच्या वतीने गुरुवार दि. 10/07/2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन करण्यात…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *