
टॉस जिंकलेल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने टीम इंडियाला प्रथम गोलंदाजी करण्यास पाचारण केले. सामन्याच्या सुरूवातीपासून भारतीय गोलंदाजांनी अतिशय संयमाने टिच्चून गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखत ऑस्ट्रेलियन संघाचा डाव केवळ २६४ वर संपवला.
त्यानंतर फलंदाजीस उतरलेल्या भारतीय फलंदाजांनी धावफलक हलता ठेवत कांगारूंच्या गोलंदाजीचा यथेच्छ समाचार घेतला. विराट कोहलीची अफलातून अर्धशतकी खेळी आणि त्याला इतर सहकारी फलंदाजांनी दिलेली साजेशी साथ यामुळे टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत देदीप्यमान विजयाला गवसणी घातली.
भारतीय क्रिकेट संघाचे हार्दिक अभिनंदन तसेच चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्याकरता मनःपूर्वक शुभेच्छा.