धाराशिव – नागरिकांच्या आरोग्य सुधारण्यासाठी केंद्र सरकारच्या फिट इंडिया मूव्हमेंट अंतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहे.त्याचाच एक भाग म्हणून फिट इंडिया सायकलिंग ड्राइव्ह उपक्रम सुरू करण्यात आला आहे.हा उपक्रम “Every Sunday on Cycle” या संकल्पनेखाली नियमितपणे साजरा केला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या “मन की बात” या ११७ व्या भागात या मोहिमेचे कौतुक केले आहे.या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरिक, शासकीय कर्मचारी आणि फ्युचर सायकलिंग ग्रुप यांच्या सहकार्याने २ मार्च रोजी सकाळी ७.३० वाजता “Every Sunday on Cycle” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सायकल रॅलीची सुरुवात श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथून होणार असून महात्मा ज्योतिबा फुले चौक – जिल्हाधिकारी कार्यालय -मध्यवर्ती प्रशासकीय इमारत -राजमाता जिजाऊ चौक – संत गाडगेबाबा चौक -डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक.समारोप श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम, धाराशिव येथे होणार आहे.या उपक्रमात अधिकाधिक नागरिक, शासकीय अधिकारी,कर्मचारी, युवक,युवती आणि खेळाडूंनी सहभागी व्हावे.असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी केले आहे.