
बार्शी : बार्शीमध्ये कै. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज भव्य कॅण्डल मार्च काढण्यात येणार आहे. या मार्चमध्ये नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या भावना व्यक्त करतील. हत्येचा निषेध करण्यासाठी आणि आरोपींना कठोर शिक्षा मिळावी, विशेषतः फाशीची शिक्षा द्यावी, अशी जोरदार मागणी बार्शीकरांकडून केली जात आहे.
या कँडल मार्चमुळे समाजात एकता आणि अन्यायाविरोधातील संघर्षाचा संदेश देण्याचा प्रयत्न होणार आहे. प्रशासनाने या प्रकरणात तातडीने कारवाई करून न्याय सुनिश्चित करावा, अशी अपेक्षा आहे.