
परंडा-मातृभाषेतून शिक्षण घेतलेल्यांची प्रगती ही अत्यंत मोठ्या प्रमाणात असून त्यासाठी सर्वसमावेशक प्रयत्न होण्याची गरज आहे,असे प्रतिपादन माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी केले.
ते श्रीकृष्ण बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ परंडा संचलित कल्याणसागर माध्यमिक विद्यालय परंडा येथील इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांसाठी आयोजित शुभेच्छा समारंभात बोलत होते
कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीत म्हणून कल्याणसागर समुहाच्या सचिवा सौ. प्रज्ञाताई कुलकर्णी, कल्याणसागर समुहाचे मार्गदर्शक,भाजपा धाराशिव जिल्हा सरचिटणीस श्री विकास कुलकर्णी हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन,दीप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.मान्यवरांच्या हस्ते स्वयंशासन दिनाचे पदाधिकारी ऋषिकेश लांडगे,प्रणव वेताळ,सागर गाडे, अरसीन शेख, ईशल मुजावर, मयुरी कांबळे आस्था ठाकूर, आलीया शेख,इम्तियाज जिनेरी, भाग्यश्री घाडगे, प्रतिक्षा काकडे,अथर्व झाडबुके, रितेश अलबत्ते,ओंकार गायकवाड, संकेत केमदारने,शिवशंभो साळुंखे,रिझा शेख,सुहाना शेख यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच एन. एम. एम. एस. शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र आठ विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला. विद्यालयातील सर्व शिक्षक,सेवक यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री किरण गरड सर यांनी केले तर सूत्रसंचालन मयुरी कांबळे व आर्या लांडगे यांनी व आभार वैष्णवी पाटील हिने मानले.