
परंडा – सरस्वती प्राथमिक शाळा व कल्याणसागर माध्यमिक विद्यालय परंडा येथील ध्वजारोहण संस्थेच्या सचिवा सौ. प्रज्ञाताई कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळेस सरस्वती प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यानी राष्ट्र भक्तीपर,देशभक्तीपर गीत देखाव्यासह सादर केली,कल्याणसागर माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थ्यानी भाषण करुन सर्वांना मंत्रमुग्ध केले.
कल्याणसागर बालवाडी विभागातील विद्यार्थ्याना बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळेस कल्याणसागर समुहाचे मार्गदर्शक श्री विकास कुलकर्णी,कल्याणसागर बॅकेचे माजी चेअरमन श्री अजित पाटील, सौ. ऐश्वर्या कुलकर्णी, मुख्याध्यापक श्री चंद्रकांत पवार, मुख्याध्यापक श्री किरण गरड, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमानंतर उपस्थित विद्यार्थ्याना खाऊवाटप करण्यात आले.