
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व ऊर्जा राज्यमंत्री तथा मंडळाच्या उपाध्यक्ष मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या सूत्रधारी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक सह्याद्री राज्य अतिथिगृह येथे पार पडली.
राज्यातील सौरऊर्जा प्रकल्पांच्या कामांना गती देतानाच त्यात गुणवत्ता राखण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. राज्य ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवायचे आहे. त्यासाठी विजेशी संबंधित सर्व कंपन्या सुस्थितीत आणाव्या लागतील. ऊर्जा विभागांतर्गत कार्यरत कंपन्यांबाबत येणाऱ्या तक्रारी कालमर्यादेत सोडविण्यासाठी जिल्हा, विभाग स्तरावरील यंत्रणा सक्षम करण्यात यावी – मुख्यमंत्री