धाराशिव – सन २०२३ – २४ साठी सूक्ष्म व लघु उत्पादक प्रवर्गातील उद्योग घटकांना आवाहन करण्यात येते की,ज्या उद्योग घटकाचे उत्पादन किमान मागील चार वर्षापासून चालू आहे.उत्पादन व रोजगारात त्यांची नियमित वाढ झाली आहे,अशा उद्योग घटकांनी ३ जानेवारी २०२४ पर्यंत जिल्हा उद्योग केंद्र,धाराशिव येथे कागदपत्रासह अर्ज सादर करावा.
हा पुरस्कार पालकमंत्री यांच्या शुभहस्ते २६ जानेवारी २०२५ रोजी मुख्य ध्वजारोहन कार्यक्रम वेळी प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप प्रथम पुरस्कार – १५ हजार रुपये व स्मृतिचिन्ह,द्वितीय पुरस्कार – १० हजार रुपये व स्मृतिचिन्ह असे आहे.
तरी पात्र सूक्ष्म व लघु उत्पादक घटकांनी पुरस्कारासाठी अर्ज करावे असे आवाहन अमोल बळे महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र,धाराशिव यांनी केले आहे.