भारत बंदची मोठी घोषणा, 25 कोटी कामगार आंदोलनात उतरणार; शाळा, बँका… काय बंद राहणार? 

Spread the love

केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या आणि कामगार कायद्यांच्या विरोधात देशातील कामगार संघटनेने 9 जुलै रोजी भारत बंदची घोषणा दिली आहे. बुधवारी होणाऱ्या या बंदमध्ये देशभरातील 25 कोटी कामगार भाग घेणार असल्याची माहिती आहे. त्यामध्ये बँकिंग, खाणकाम, पोस्टल सर्व्हिस, बांधकाम यासह अनेक क्षेत्रातील कामगार या बंदमध्ये सहभागी होणार आहे. त्यामुळे देशातील प्रमुख सेवांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

देशातील 10 प्रमुख कामगार संघटनांनी या भारत बंदची घोषणा केली आहे. त्याचसोबत या संघटनांच्या संबंधित इतर कामगार संघटनांही त्यामध्ये भाग घेणार असल्याची माहिती आहे. केंद्र सरकारने कामगार विरोधी, शेतकरी विरोधी  धोरण अवलंबल्याचा आरोप या संघटनांनी केला आहे. सरकारच्या या धोरणांचा फायदा केवळ उद्योगपतींना, त्यांच्या उद्योगांना होणार असल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे. 

भारत बंदमध्ये काय बंद राहील?

बँकिंग सेवा

विमा कंपन्यांचे काम

पोस्ट ऑफिस

कोळसा खाणींचे काम

राज्य वाहतूक सेवा (सरकारी बसेस)

महामार्ग आणि रस्ते बांधकाम

सरकारी कारखाने आणि कंपन्यांचे उत्पादन.

बंद का पुकारण्यात आला?

कामगार संघटनांनी केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया याच्याकडे 17 प्रमुख मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी केली होती. पण केंद्र सरकारकडून त्याला कोणतंही उत्तर देण्यात आलं नाही. त्याचमुळे 9 जुलै रोजी भारत बंदची हाक देण्यात आल्याचं कामगार संघटनांनी म्हटलं आहे. 

केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात येणारी वार्षिक कामगार परिषद गेल्या 10 वर्षांपासून घेण्यात आली नाही. त्याचवेळी सरकारने चार कामगार कायदे अंमलात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यामुळे भविष्यात कामगार संघटना खिळखिळ्या करण्याचा केंद्राचा प्रयत्न असल्याचा आरोप करण्यात येत आहे

  • Related Posts

    धाराशिव एसटी बस आगारामध्ये दैनंदिन चालक / वाहक ड्युटी बुकिंग मध्ये मनमानी कारभार, वरिष्ठ विभागीय कार्यालय यांच्या आदेशास केराची टोपली

    Spread the love

    Spread the loveधाराशिव (प्रतिनिधी) धाराशिव एसटी आगारातील चालक-वाहकांच्या दैनंदिन ड्युटी बुकिंग प्रक्रियेत गंभीर अनियमितता उघडकीस आली असून, वरिष्ठ विभागीय कार्यालयाच्या स्पष्ट आदेशानंतरही नियमांचे उल्लंघन होत असल्याचा धक्कादायक आरोप कर्मचारी वर्गातून…

    धाराशिव प्रभाग-४ मध्ये १५ दिवसांपासून पाणीटंचाई; घंटा गाडीही गायब — नागरिकांचा संताप उफाळला

    Spread the love

    Spread the loveधाराशिव शहरातील प्रभाग क्रमांक ४ मध्ये मागील १५ दिवसांपासून नळाला पाणी न आल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. नियमित नळपट्टी भरूनही पाणीपुरवठा बंद का आहे, असा सवाल स्थानिकांनी उपस्थित…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *