दिव्यांग उमेदवाराच्या न्यायासाठी पित्याचे आमरण उपोषण सुरू

Spread the love

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु झाले आंदोलन

धाराशिव  (प्रतिनिधी) -: धाराशिव जिल्हा परिषदेच्या कनिष्ठ अभियंता पदासाठी भरती प्रक्रियेत पात्र ठरूनही नियुक्ती न मिळाल्यामुळे अन्याय झाल्याची भावना व्यक्त करत प्रमोद दयानंद भोसले या दिव्यांग उमेदवाराच्या वडिलांनी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि.३० जून पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की दयानंद भोसले यांनी आपल्या मुलाच्या हक्कासाठी विविध स्तरांवर पाठपुरावा केला असून, दिव्यांग कल्याण आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनीही २१ जून २०२५ रोजी जिल्हा परिषदेला पत्र पाठवून संबंधित उमेदवारास नियुक्तीसाठी पात्र ठरवले असल्याचे स्पष्ट केले होते. त्यांच्या मुलाला झालेल्या परीक्षेत २०० पैकी ९० गुण मिळाले असून तो अंध प्रवर्गातील उमेदवार आहे. शासनाच्या नियमांनुसार दिव्यांग उमेदवारांना राखीव जागा असूनही या उमेदवारास नियुक्ती न मिळाल्यामुळे त्याच्या पालकांमध्ये संतापाची भावना आहे.

दयानंद भोसले यांनी यापूर्वीही मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, धाराशिव यांच्याकडे भेट देऊन निवेदन दिले होते. परंतु नियुक्तीसंदर्भात कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्यामुळे त्यांनी आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे.

“शासनाच्या धोरणांनुसार आणि आयुक्तांच्या स्पष्ट पत्रानुसार माझा मुलगा पात्र असूनही त्याच्या न्यायासाठी मला रस्त्यावर उतरावे लागत आहे, ही शासन यंत्रणेची मोठी शोकांतिका आहे,” असे दयानंद भोसले यांनी सांगितले.

या उपोषणाची माहिती शासनाच्या विविध अधिकाऱ्यांना देण्यात आली असून, न्याय न मिळाल्यास न्यायालयातही दाद मागण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

  • Related Posts

    धाराशिव एसटी बस आगारामध्ये दैनंदिन चालक / वाहक ड्युटी बुकिंग मध्ये मनमानी कारभार, वरिष्ठ विभागीय कार्यालय यांच्या आदेशास केराची टोपली

    Spread the love

    Spread the loveधाराशिव (प्रतिनिधी) धाराशिव एसटी आगारातील चालक-वाहकांच्या दैनंदिन ड्युटी बुकिंग प्रक्रियेत गंभीर अनियमितता उघडकीस आली असून, वरिष्ठ विभागीय कार्यालयाच्या स्पष्ट आदेशानंतरही नियमांचे उल्लंघन होत असल्याचा धक्कादायक आरोप कर्मचारी वर्गातून…

    धाराशिव प्रभाग-४ मध्ये १५ दिवसांपासून पाणीटंचाई; घंटा गाडीही गायब — नागरिकांचा संताप उफाळला

    Spread the love

    Spread the loveधाराशिव शहरातील प्रभाग क्रमांक ४ मध्ये मागील १५ दिवसांपासून नळाला पाणी न आल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. नियमित नळपट्टी भरूनही पाणीपुरवठा बंद का आहे, असा सवाल स्थानिकांनी उपस्थित…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *