
धाराशिव (प्रतिनिधी) – दिनांक 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रासह भारतातील बहुसंख्य राज्यांची निर्मिती ही भाषिक तत्त्वावर करण्यात आलेली होती. त्यामध्ये महाराष्ट्राची रचना ही मराठी भाषेच्या भाषिक तत्त्वावर झालेली आहे. संपूर्ण मुंबई, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा या सह संपूर्ण महाराष्ट्र मराठी भाषेत बोलणारा प्रदेश असल्यामुळे महाराष्ट्राची राजभाषा ही मराठी करण्यात आलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रावर केवळ मराठी भाषेचा अधिकार आहे.शासनाच्या नवीन अध्यादेशामुळे महाराष्ट्रातील शालेय शिक्षणामध्ये भाषा विषय म्हणून हिंदी भाषेचा अनिवार्य विषय करण्यात आलेला आहे. हिंदी भाषा महाराष्ट्रावर लादण्याचा हा प्रकार आहे. संपूर्ण देशभरातील राज्यांची निर्मिती ही भाषीय तत्त्वावर झालेली असताना स्वतंत्र भारतामध्ये कोणत्याही राज्यांमध्ये भाषेची सक्ती करण्यात येणार नाही असे राज्यघटनेत नमूद करण्यात आलेले आहे. तरी शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषेची करण्यात आलेली सक्ती तातडीने मागे घेण्यात यावी अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी जनता व शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिवच्या वतीने मोठे जन आंदोलन उभारण्यात येईल याची शासनाने प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी अशा प्रकारचे निवेदन शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिव जिल्हा, शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिव शहर, शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिव तालुका, शिवराज्याभिषेक रिक्षा समिती धाराशिव यांचे वतीने मा. मामहीम राज्यपाल साहेब महाराष्ट्र राज्य मुंबई आणि मा. मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य मुंबई यांना माननीय जिल्हाधिकारी साहेब धाराशिव, तसेच मुख्याधिकारी साहेब नगरपरिषद धाराशिव,व शिक्षणाधिकारी साहेब जिल्हा परिषद धाराशिव ( माध्यमिक व उच्च माध्यमिक) आणि शिक्षणाधिकारी साहेब जिल्हा परिषद धाराशिव (प्राथमिक) धाराशिव यांच्याद्वारे देण्यात आले. यावेळी शिवराज्याभिषेक सोहळा समिती धाराशिव ची श्री धर्मराज सूर्यवंशी, अमोल पवार ,हनुमंत यादव, आकाश भोसले, संतोष घोरपडे ,हनुमंत तांबे ,बबलू भोईटे ,व्यंकटेश पडिले, ज्ञानेश्वर नलावडे ,अमोल साळुंके, भैरवनाथ रणखांब ,दत्तात्रय साळुंके ,नितीन वीर, योगेश अतकरे, प्रशांत नांदे ,बालाजी पवार ,सचिन खापरे, अक्षय घाडगे ,ज्योतीराम काळे ,अमोल गोरे ,तुषाल सूर्यवंशी, विश्वंभर आगळे, संजय शिंदे ,बालाजी खोचरे ,ज्ञानेश्वर मते, अॕडव्हेकेट अविनाश गरड ,ॲडव्होकेट ओंकार शितोळे यांचे सह समितीचे बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.