
धाराशिव (प्रतिनिधी ) – शिवराज्याभिषेक रिक्षा समिती धाराशिवच्या वतीने धाराशिव शहरातील सर्व परवानाधारक ऑटो रिक्षा चालक-मालकांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय धाराशिव तसेच पोलीस वाहतूक नियंत्रण शाखा धाराशिव यांना निवेदन दिले की, धाराशिव शहरांमध्ये हजारोंच्या संख्येने विना कागदपत्र, स्क्रॅप,विनापरवाना ऑटो रिक्षा बेकायदेशीरपणे प्रवासी वाहतूक व्यवसाय करत आहेत. वाहतुकी संबंधित दोन्हीही कार्यालयास वारंवार निवेदन देऊन सुद्धा अशा विना कागदपत्र, स्क्रॅप, विनापरवाना ऑटो रिक्षावर कारवाई करत नाहीत. यामुळे परवानाधारक, टॅक्स भरणारे ऑटो रिक्षा चालक मालकांवर फार मोठा अन्याय होत आहे. विना कागदपत्र विनापरवाना स्क्रॅप ऑटोरिक्षा मुळे परवानाधारक ऑटो रिक्षा चालक चालकांच्या व्यवसायावर गंभीर परिणाम होत आहे. तरी संबंधित दोन्ही विभागांनी लवकरात लवकर कठोरात कठोर कारवाई न केल्यास सर्व परवानाधारक ऑटो रिक्षा चालक-मालक यांच्यावतीने उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला तसेच याची सर्वस्वी जबाबदारी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व वाहतूक नियंत्रण शाखा यांची राहील असे निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे. यावेळी रिक्षा समितीचे अध्यक्ष श्री वेंकटेश पडिले, उपाध्यक्ष श्री तुषाल सूर्यवंशी, सचिव श्री कलिम शेख,कार्याध्यक्ष श्री योगेश अतकरे आतकरे, श्री संतोष घोरपडे,आमेर मशायक, हुसेन सय्यद, गोविंद शिंदे, रोहित गवंडी, अजय भगत, अविनाश पवार, बजरंग पवार,गणेश मडके, बाजीराव ढवाण,विशाल कतारी, पांडुरंग महाडिक, इस्माईल शेख, अनिल मुळे,निवेश खैरे,नागेश चव्हाण, श्रीकांत कट्टी, श्रीकांत राठोड, लहू पवार, कृष्णा माणकेश्वरी यासह शेकडो ऑटोरिक्षा चालक-मालक उपस्थित होते.