१६ जून रोजी होणार पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबीर व कार्यशाळा

Spread the love

धाराशिव –  पालकमंत्री प्रताप सरनाईक हे १२ जून रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.त्यामुळे आता जिल्हा परिषद, धाराशिवच्या वतीने जिल्ह्यातील सर्व पत्रकारांसाठी आयोजित एकदिवसीय आरोग्य तपासणी शिबीर १२ जून ऐवजी आता १६ जुन रोजी आयोजित करण्यात आले आहे.

विविध उपक्रम तसेच शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन दि.१६ जून रोजी स्थायी समिती सभागृह,जिल्हा परिषद, धाराशिव येथे करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे आहे,सकाळी १० वाजता पत्रकारांची नाव नोंदणी होईल.त्यानंतर १०.३० वाजता प्रास्ताविक सत्र होईल. सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.डॉ.राठोड व डॉ.रवी चव्हाण हे पत्रकारांची आरोग्य तपासणी करतील.दुपारी १ ते २ या वेळेत जिल्हा परिषदेच्या विविध विभाग प्रमुखांकडून विविध शासकीय योजना व उपक्रमांची माहिती देणार आहे.त्यानंतर २ ते २.३० या वेळेत अल्पोहार व समारोप सत्र होईल.

या आरोग्य तपासणी शिबीर व कार्यशाळेस जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी उपस्थित राहावे,असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांनी केले आहे.

  • Related Posts

    ‘पत्रकारांनी स्वतःच्या कुटुंबासाठीही वेळ द्यावा’ : नलावडे

    Spread the love

    Spread the loveबार्शीत व्हॉइसऑफ मीडिया वतीने पत्रकारांच्या पाल्यास शालेय साहित्य वाटप बार्शी  – ( प्रतिनीधी ) : पत्रकार हा समाजाचा आरसा असतो. पत्रकारांना समाजातील सर्वच घडामोडीबाबत जागृत राहून महत्त्वाचे कर्तव्य…

    व्हॉईस ऑफ मीडिया च्या मागणीला यश,महाराष्ट्र शासनाकडून डिजिटल माध्यम जाहिरात धोरण जाहीर

    Spread the love

    Spread the loveमुंबई, बारामती व शिर्डी येथे झालेल्या अधिवेशनात केली होती मागणी. मुंबई –  डिजिटल मिडियासाठी ऐतिहासिक निर्णय! राज्य शासनाने अखेर व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल माध्यमांच्या दीर्घकालीन मागणीला प्रतिसाद देत…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *