
उपोषणकर्ते खंडोबा भक्त मानकरी यांची मागणी मंदिर परिसरातील असतानाही ग्रामपंचायत कार्यालयाने 188 गट नंबर मधील सर्वांना नोटीस देत अर्धवट अतिक्रमण हटवली.
धाराशिव – जिल्ह्यातील (कळंब) दहिफळ येथील जागृत ग्रामदैवत श्री खंडोबा देवस्थान परिसरातील अतिक्रमणाचा विषय अनेक वर्षांपासून वादग्रस्त ठरत होता. शुक्रवार दि.३० मे रोजी अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस प्रशासन,जेसीबी,ट्रॅक्टर मनुष्यबळ सह अर्धवट अतिक्रमण काढण्यात आली.
श्री खंडोबा मंदिर परिसरात झालेल्या अतिक्रमणामुळे चंपाषष्ठी सटीला भरणाऱ्या मोठ्या यात्रेला तसेच बाजाराला मोठा अडथळा निर्माण झाला होता. तसेच ग्रामपंचायत च्या दुर्लक्षामुळे अतिक्रमणात वरचेवर वाढत होत होती. मंदिर परिसरातील अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामपंचायतकडे वारंवार तक्रारी दाखल करून ही याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. यामुळे शेवटी मंदिरा परिसरातील अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी 21 नोव्हेंबर 2023 रोजी अमरण उपोषण करण्याचा इशारा देत. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 30 नोव्हेंबर 2023 ते 1 नोव्हेंबर2023 दोन दिवस अमरण उपोषण आंदोलन केले होते.यावेळी खंडोबा परिसरातील अतिक्रमण काढण्याची मागणी असतानाही ग्रामपंचायतने उपोषणकर्त्यांना आम्हाला सर्व 188 मधील सर्व अतिक्रमणा काढायचे आहेत असे सांगत भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणी करून अतिक्रमणाची कारवाई करणार असल्याचे लेखी कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.
जिल्हा, तालुका प्रशासनाने आंदोलनाची दखल घेत ग्रामपंचायत कार्यालयाला अतिक्रमण काढण्याचे आदेश दिल्यानंतर ग्रामपंचायतने अतिक्रमण परिसरात मोजणी भूमी अभिलेख कार्यालयाकडून करून घेतली परंतु हद्दीवर कुठल्याही पोल अथवा फिक्स खुणा न करता संभ्रम कायम ठेवत संबंधित अतिक्रमण धारकांना नोटीस बजावली होती.जवळपास दीड वर्षापासून हे प्रकरण सुरू होते.
11 मार्च रोजी 2025 रोजी पोलीस प्रशासनाकडून अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस संरक्षण शुल्कासाठी बिनतारी संदेश येऊनही ग्रामपंचायत कार्यालय याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष करत होते. ग्रामपंचायतच्या नाकर्तेपणाच्या विरोधात खंडोबा मंदिर परिसरातील अतिक्रमण हाटवण्यासाठी उपोषणकर्ते खंडोबा भक्तांनी जिल्हाधिकारी यांना दि २६ मे २०२५ रोजी अमरण उपोषणाचा करण्याचा इशारा देताच.याची तात्काळ दखल घेत जिल्हा प्रशासन कामाला लागले ग्रामसेवक व सरपंच यांना वरिष्ठ कार्यालयाकडून कारवाही करा, अन्यथा होणाऱ्या परिणामास आपणास जबाबदार धरण्यात येईल अशी नोटीस काढण्यात आली. त्यानंतर खडबडून जागे होत ग्रामपंचायतीने गट नंबर188 मधील शसर्वच अतिक्रमणधारकांना नोटीस बजावत 30 मे पर्यंत अतिक्रमण न काढल्यास कारवाई करण्याची नोटीस व्यावसायिक व निवासी नागरिकांना अतिक्रमण काढून घ्यावे अशी नोटीस बजावण्यात आली होती.
मंदिर परिसरातील चार ते पाच व्यवसायधारकांना इतरत्र ग्रामपंचायतने व्यवस्था केली असती तर जवळपास 15 ते20 व्यवसायीकांना याचा फटका बसला नसता. ग्रामपंचायत कार्यालय धरसोडीची भूमिका घेतल्यामुळे अतिक्रमणधारकांना
स्थलांतरित व्हावे लागले.
अचानक अतिक्रमणाचा हातोडा पडल्यामुळे व्यवसायिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.निवासी अतिक्रमण पावसाळ्यात काढता येत नाही म्हणून ते पुढे ढकलण्यात आले आहे. तसेच अर्धवट अतिक्रमण काढण्यात आलेली असल्याचे नेमके अतिक्रमण काढण्यासाठी कोणता फार्मूला वापरण्यात आला आहे असा सूर गावकऱ्यातून एकावयास येत आहे. तसेच ग्रामपंचायत कार्यालयाने केलेल्या मोजणीच्या कायमच्या हद्दी फिक्स केल्याचे दिसून येत नाही, त्यामुळे नेमकी हद्द कुठे आहे ही समजूनही येत नाही. त्यामुळे फिक्स दगडाच्या मोठ्या खुणा सिमेंट पोल कधी उभारणार अशी ही चर्चा ग्रामस्थातून ऐकावयास येत आहे.नाहीतर मोठ्याचा गाडा आला अन गरिबाचं घर मोडा अशी परिस्थिती होऊ नये अशी ही चर्चा ग्रामस्थातून रंगत आहे.
खंडोबा मंदिर परिसरात अतिक्रमण झाल्यामुळे यात्रेला अडथळा निर्माण झाला होता.श्री खंडोबा देवस्थान जागृत देवस्थान आहे.भाविकांची गर्दी वाढत आहे.अतिक्रमणामुळे अनेक दुर्घटना झाल्या आहेत.खंडोबा भक्तांनी अतिक्रमण काढण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली होती.ग्रामपंचायतने आज कार्यवाही केली आहे.
यात्रेला अडथळा होणार नाही.तसेच व्यवसायिकांना चांगल्या प्रकारे नियोजन बद्ध गाळे काढून देणार आहोत.सर्वांनी सहकार्य केले.त्यांचा विचार आम्ही नक्की करू.
-सरपंच चरणेश्वर पाटील