
धाराशिव – महिला व बालविकास विभाग अंतर्गत कार्यरत धर्मवीर संभाजीराजे सामाजिक बहुउद्देशीय संस्था, तुळजापूर संचलित निरीक्षणगृह / बालगृह धाराशिव येथील मुलांचा एमटीएस ऑलंपियाड परीक्षांमध्ये रुद्राक्ष गायकवाड याचा पहिला क्रमांक तर अभिजीत डफळे याचा दुसरा क्रमांक आला.
महिला व बालविकास विभाग अंतर्गत कार्यरत धर्मवीर संभाजीराजे सामाजिक बहुउद्देशीय संस्था, तुळजापूर संचलित निरीक्षणगृह / बालगृह धाराशिव येथील मुलांचा एमटीएस ऑलंपियाड इयत्ता चौथी परीक्षांमध्ये रुद्राक्ष गायकवाड याचा पहिला क्रमांक तर इयत्ता तिसरी एमटीएस ओलंपियाड परीक्षेमध्ये अभिजीत डफळे याचा दुसरा क्रमांक आला.यावेळी संस्थेचे सचिव सुधीर कदम, महिला व बालविकास कार्यालयाचे जिल्हा परिविक्षा अधिकारी तथा अधीक्षक व्यंकट देवकर साहेब,संस्थेचे कर्मचारी माधुरी हरवले, शहापुरे आर.के,कदम बी.आर,शिंदे.ए.एल,आशा भिसे,प्रशांत मते,अक्षय निपाणीकर आदींच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी हे यश मिळवले.