राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 संदर्भात शिवसेना स्टाईल आंदोलन यशस्वी महामार्गाच्या कामांना गती – खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर

Spread the love

उमरगा – 23 फेब्रुवारी 2025: वारंवार सुचना देऊनही सोलापूर-उमरगा राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 च्या कामाला विलंब होत असल्याने गतवर्षी टोल बंद आंदोलन करून काम सुरू करण्यास भाग पाडण्यात आले होते. त्यानंतरही काही भागांतील काम अपूर्ण राहिल्याने आज आमदार प्रविण स्वामी, प्रकल्प संचालक, उपविभागीय अधिकारी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत या महामार्गाची पाहणी करण्यात आली.
यावेळी अणदूर ते उमरगा दरम्यानच्या रस्त्याच्या अपूर्ण कामांची तपासणी करण्यात आली. अनदूर येथे नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण झाल्याने काही घरांमध्ये पाणी शिरत असल्याचे निदर्शनास आले. त्यावर तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच, महामार्गावरील उड्डाणपूल आणि बायपास मार्गांच्या कामांच्या मुदती निश्चित करण्यात आल्या. अणदूर उड्डाणपूल व नळदुर्ग बायपास: 5 मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन,येणेगूर व मुरूम मोड उड्डाणपूल: 31 मार्चपर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याचे निर्देश,आष्टा मोड उड्डाणपूल: 31 डिसेंबरपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना, भोसगा व जकेकुर येथे पादचारी पुलांची गरज असल्याने सदर ठिकाणी पुल उभारणेबाबत सुचना करण्यात आले आहे.
सततच्या पाठपुराव्यांमुळे डाळिंब, उमरगा चौरस्ता व तुरोरी येथील उड्डाणपूलाचे काम पूर्ण झाले असून, त्यामुळे वाहतूक सुरळीत होऊन अपघातांचे प्रमाण कमी झाले आहे. यावेळी आलियाबाद शिवारातील शेतकऱ्यांचा शेतरस्ता पूर्णतः बंद झाल्याने त्यासाठी पर्यायी मार्ग देण्याची मागणी झाली. तसेच, भू-संपादन व मावेजा संदर्भातील प्रलंबित प्रकरणे सोडवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीचे निर्देश देण्यात आले.
या दौऱ्यात आमदार प्रवीण स्वामी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक, तसेच संबंधित प्रशासकीय व पोलीस अधिकारी उपस्थित होते.

  • Related Posts

    लोहटा पूर्व गावास महसुली दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा! महसूल मंत्री यांच्या उपस्थितीत बैठक , आमदार कैलास पाटील यांची माहिती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव ता. 14: कळंब तालुक्यातील लोहटा (पूर्व) गावाला महसुली ओळख मिळवण्यासाठी लढा द्यावा लागला होता अखेर या गावास आता महसूली दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती आमदार कैलास…

    श्री. सिद्धीविनायक सोशल फाऊंडेशनचा सहकार सन्मान उपक्रम जबाबदारीच्या पलीकडचा संवाद

    Spread the love

    Spread the loveधाराशिव सहकार दिनाचे औचित्य साधून श्री. सिद्धीविनायक सोशल फाऊंडेशन, धाराशिव यांच्या वतीने संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या संकल्पनेनुसार, धाराशिव जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *