धाराशिव जिल्ह्यातील वडगावचे सुपुत्र गणपत मोरे यांच्याकडे पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक पदाची धुरा

Spread the love

पुणे – शालेय शिक्षण विभागातर्फे गुरुवारी विविध शिक्षण अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक पदी डॉ.गणपत मोरे यांची बदली करण्यात आली असून मुंबई विभागाच्या शिक्षण उपसंचालक पदी आर. आर. कंकाळ यांची बदली केली आहे. गेल्या काही वर्षांपासून पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार शिक्षण विभागातील इतर अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला होता. अखेर गणपत मोरे यांची बदली झाल्याने पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाला पूर्णवेळ अधिकारी मिळाले आहेत.

नाशिक विभागाच्या शिक्षण उपसंचालक पदी संजय कुमार धर्मा राठोड यांची बदली केली आहे.राठोड हे परीक्षा परिषद कार्यालयात उपायुक्त पदी कार्यरत होते.तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातील शिक्षण उपसंचालक वंदना वाहूळ यांची योजना विभागात शिक्षण उपसंचालक पदी बदली करण्यात आली आहे. तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातील दीपक चावणे यांची राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद येथे शिक्षण उपसंचालक पदी बदली झाली आहे.तसेच निशादेवी बंडगर यांची राज्य परीक्षा परिषदेच्या उप आयुक्त पदी बदली करण्यात आली आहे.

  • Related Posts

    केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या कामगिरीवर १ व २ सप्टेंबर रोजी धाराशिव येथे मल्टिमीडिया चित्रप्रदर्शन

    Spread the love

    Spread the love‘विकसित भारत रोजगार आणि आजीविका गॅरंटी मिशन २०२५’चीही माहिती दिली जाणार धाराशिव – केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या सेवा कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रांत केलेली…

    संकटातील बालकांसाठी ‘१०९८’चा आधार ; शाळांमध्ये जनजागृती

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – संकटात सापडलेल्या, अडचणीत असलेल्या किंवा मदतीची गरज असलेल्या बालकांना वेळीच आधार मिळावा, त्यांच्या हक्कांची जाणीव व्हावी आणि बालकांशी संबंधित समस्यांबाबत संवेदनशीलता वाढावी,या उद्देशाने चाईल्ड हेल्पलाईन कक्ष…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *