
धाराशिव – महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने ३० मे २०२५ रोजी एक महत्त्वाचा शासकीय आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार ओंकार देशमुख यांची धाराशिव उपविभागीय अधिकारी (SDO) म्हणून बदली करण्यात आली आहे.
देशमुख सध्या जिल्हा पुरवठा अधिकारी, बीड या पदावर कार्यरत होते. आता त्यांची बदली करून त्यांना धाराशिव जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. ही बदली तात्काळ प्रभावी असून, त्यांना तत्काळ (म.पू.) नवीन पदाचा कार्यभार स्वीकारण्याचे आदेश दिले गेले आहेत.
अधिकाऱ्याचे नाव सध्याचे पद नवीन पद ओंकार देशमुख जिल्हा पुरवठा अधिकारी, बीड येथून धाराशिव येथे उपविभागीय अधिकारी, धाराशिव उपविभाग म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
धाराशिव जिल्ह्याच्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी म्हणून ओंकार देशमुख यांची नियुक्ती करण्यात आल्याने स्थानिक प्रशासनाला नवे नेतृत्व मिळाले आहे. त्यांच्या कार्यकुशलतेचा उपयोग जिल्ह्याच्या विकासामध्ये होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.