
पुणे – पुण्यात स्वारगेट बसस्थानक येथे झालेली अत्याचाराची घटना ह्याच बसमध्ये झाली आहे…
महत्वाचं म्हणजे ही बस बसस्थानकाच्या मधोमध आणि ‘सुरक्षा कार्यालयाच्या एकदम समोर थांबलेली होती…’
तरी सुद्धा ह्या मध्ये हा निंदनीय प्रकार घडला आहे!
महाराष्ट्रातील सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जाणार पुणे शहर कोणत्या वळणावर चालले आहे.
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर उभ्या असलेल्या एका शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली. एका २६ वर्षीय तरुणीला साताऱ्याच्या गाडीत बसवून देतो म्हणून आरोपीने बलात्कार केला. या घटनेचे तीव्र पडसाद पुण्यात उमटले आहेत. शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांनी दुपारी चार वाजेच्या सुमारास बस स्थानक परिसरात असलेल्या सुरक्षा कार्यालयाची तोडफोड केली.