
धाराशिव – सन २०२५ या वर्षातील स्थानिक सुट्ट्या जिल्हाधिकारी डॉ. मैनक घोष यांनी जाहीर केल्या आहे.सन २०२५ या वर्षात तीन स्थानिक सुट्ट्या देण्यात आल्या आहे.
यामध्ये १७ जानेवारी २०२५ (शुक्रवार) – हजरत ख्वाजा शमशुद्दीन गाजी रहे दर्ग्याचा ऊर्स,१ सप्टेंबर २०२५ (सोमवार) – ज्येष्ठा गौरी पूजन आणि २० ऑक्टोबर २०२५ (सोमवार) – नरक चतुर्दशी अभ्यंग स्नान या सुट्ट्यांचा समावेश आहे.
या स्थानिक सुट्ट्या जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालये,जिल्हा परिषदेअंतर्गत येणारी कार्यालये, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांचे कार्यालये,कोषागार कार्यालये व इतर शैक्षणिक संस्था यांनाच लागू राहतील.
जिल्ह्यातील दिवाणी व फौजदारी न्यायालये,केंद्र शासनाच्या कार्यालयांना व बँकांना या सुट्ट्या लागू राहणार नाही.