एस.बी.एन.एम. कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये रिसर्च पेपर प्रकाशित…

Spread the love

धाराशिव (प्रतिनिधी) – व्ही. पी. कॅम्पस, धाराशिव येथील श्री भैरवनाथ निसर्ग मंडळ संचलित औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालयातील अंतिम वर्षातील वैशाली मुंडे,खिजरा पठाण आणि जिशान शेख या तीन विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय जर्नल- ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ रिसर्च अँड अनालिटिकल रिव्हीवज’ (IJRAR) या नामांकित जर्नल मध्ये “नीड फॉर अँटीमयक्रोबिअल स्टेवॉर्डशीप इन इंडियन हेल्थकेअर सिस्टिम प्रायमरी अँड सेकंडरी केअर हॉस्पिटल्स” या विषयावर रिसर्च पेपर प्रकाशित झाला.
या रिसर्च पेपरमध्ये त्यांनी MOH इंडिया आणि WHO च्या गाइडलाइन्सनुसार अँटिमाइक्रोबियल स्टीवर्डशिपची प्राथमिक आणि दुय्यम काळजी रुग्णालयांमध्ये का गरज आहे याचे महत्त्व सांगितले आहे. त्यांच्या या उत्कृष्ट कार्याबद्दल धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील प्रा.शमा महाडिक,गौरव बागल,मंगेश निंबाळकर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.बी.ननवरे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या संशोधन कार्यात विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील प्रा.डॉ. तांबोळी सोहेल यांचे मार्गदर्शन लाभले.

  • Related Posts

    कल्याणसागरचा माजी विद्यार्थी उत्कर्षचे नीट व जेईई परीक्षेत उत्तुंग दुहेरी यश!‘नीटचे 656 गुण तर जेईई मध्ये 99.40 पर्सेंटाईल’

    Spread the love

    Spread the loveपरंडा:- कल्याणसागर समुहातील परंडा येथील सरस्वती प्राथमिक शाळा व कल्याणसागर माध्यमिक विद्यालयाचा माजी विद्यार्थी उत्कर्ष गजानन कोठावळे याने नीट (NEET) आणि जेईई (JEE) या राष्ट्रीय पातळीवरील दोन्ही अत्यंत…

    उस्मानाबाद जिल्हा खाजगी शिक्षण संस्था चालक संघटनेची बैठक संपन्न

    Spread the love

    Spread the loveधाराशिव – : उस्मानाबाद जिल्हा खाजगी शिक्षण संस्था चालक संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी (दि. २ जून २०२६) दुपारी १२.३० वाजता के. टी. पाटील डी. फार्मसी कॉलेज येथे उत्साहपूर्ण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *